Nitish Bharadwaj  
मनोरंजन

'घटस्फोट हा मृत्यूपेक्षाही अधिक वेदनादायक असू शकतो'

'महाभारत'मध्ये 'कृष्ण' साकारणारे अभिनेते नितीश भारद्वाज यांनी व्यक्त केल्या भावना

स्वाती वेमूल

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटविणारा अभिनेता धनुष (Dhanush) याने सोमवारी त्याच्या पत्नीशी घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं. धनुष आणि रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या हे १८ वर्षांच्या संसारानंतर विभक्त झाले. याआधी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य ही जोडी विभक्त झाली. कलाविश्वातील अशा बऱ्याच जोड्या आहेत, ज्यांनी घटस्फोटाचं वृत्त सांगत चाहत्यांना मोठा धक्का दिला. मात्र घटस्फोट हा मृत्यूपेक्षाही अधिक वेदनादायक असू शकतो, अशी भावना 'महाभारत' या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेते नितीश भारद्वाज (Nitish Bharadwaj) यांनी व्यक्त केली. नितीश यांचासुद्धा सप्टेंबर २०१९ मध्ये घटस्फोट झाला. १२ वर्षांच्या संसारानंतर त्यांनी आयएएस अधिकारी असलेल्या पत्नीला घटस्फोट दिला. नितीश आणि स्मिता यांना जुळ्या मुली असून त्या आईसोबतच इंदूरमध्ये राहतात. (Divorce)

'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत नितीश म्हणाले, "सप्टेंबर २०१९ मध्ये मी मुंबईच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. आम्ही विभक्त होण्याचा निर्णय का घेतला, याबद्दल मला सांगायचं नाहीये, पण घटस्फोटाची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. मी इतकंच सांगू शकतो की घटस्फोट हा मृत्यूपेक्षाही अधिक वेदनादायी असू शकतो."

लग्नाबाबत ते पुढे म्हणाले, "मला लग्नसंस्थेवर पूर्ण विश्वास आहे. पण त्याबाबतीत मी कमनशिबी ठरलो. लग्न अयशस्वी ठरण्याची अनेक कारणं असू शकतात. काहीवेळा ते तडजोड न करण्याच्या वृत्तीमुळे किंवा अहंकार आणि आत्मकेंद्रित विचारसरणीमुळे असू शकतं. पण कुटुंब तुटल्यावर सगळ्यात जास्त त्रास मुलांना होतो. त्यामुळे, आपल्या मुलांना कमीत कमी नुकसान सहन करावं लागेल, याची खात्री करण्याची जबाबदारी पालकांवर आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Vidarbha News: भरधाव दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार; जाम महामार्गावर नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकीने वाहनाला धडक

SCROLL FOR NEXT