divya bharti 
मनोरंजन

दिव्या भारतीने जाता जाता या अभिनेत्रीला केलं स्टार

स्वाती वेमूल

दमदार अभिनयासोबतच भुरळ घालणाऱ्या सौंदर्यासाठी अभिनेत्री दिव्या भारती ओळखली जायची. दिव्या भारतीच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर मिळत असलेलं यश पाहून अनेक निर्मात्यांनी तिला चित्रपटांची ऑफर दिली होती. करिअरच्या शिखरावर असताना तिनेसुद्धा अनेक चित्रपट साइन केले होते. मात्र तिच्या अचानक निधनामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली होती. काही चित्रपटांची शूटिंग अर्ध्यावरच थांबली होती. अखेर त्या दिग्दर्शकांना दुसऱ्या अभिनेत्रींसोबत ते चित्रपट पूर्ण करावे लागले होते. त्यापैकीच एक चित्रपट होता, 'मोहरा'. 

राजीव रॉय दिग्दर्शित 'मोहरा' या चित्रपटातील गाणी आजसुद्धा अनेकांना तोंडपाठ असतील. 'टिप टिप बरसा पानी', 'तू चीज बडी है मस्त मस्त' ही गाणी तुफान गाजली होती आणि आजही त्या गाण्यांची क्रेझ पाहायला मिळते. त्याचसोबत या चित्रपटातील अक्षय कुमार व रवीना टंडन यांची जोडी सुपरहिट ठरली होती. पण सुरुवातीला राजीव यांनी मुख्य अभिनेत्रीसाठी दिव्या भारतीला साइन केलं होतं. तिने चित्रपटातील काही भागाचं शूटिंगसुद्धा केलं होतं. पण त्याचदरम्यान तिच्या अकस्मात निधनाची बातमी समोर आली. दिव्याच्या निधनामुळे चित्रपटाची शूटिंग अर्ध्यावरच थांबली होती. 

उर्वरित शूटिंग पूर्ण करण्यासाठी राजीव यांनी नव्या अभिनेत्रीला साइन केलं आणि ती अभिनेत्री होती रवीना टंडन. १९९४ मध्ये 'मोहरा' हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यावेळी हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. या चित्रपटाने अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्येही बाजी मारली होती. या चित्रपटातील रवीनाच्या अभिनयाची व अक्षय कुमारसोबत तिच्या केमिस्ट्रीची जोरदार चर्चा झाली होती. 'मोहरा' चित्रपटाने रवीनाला यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवलं होतं. त्यामुळे दिव्या भारतीने जाता जाता रवीनाला स्टार बनवलं, असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT