Divya Dutta refused Bhaag Milkha Bhaag  Esakal
मनोरंजन

Divya Dutta चं 'भाग मिल्खा भाग' विषयी हैराण करणारं विधान..म्हणाली,'मला खरंतर सिनेमात कामच करायचं नव्हतं कारण..'

दिव्या दत्तानं नुकतंच एका मुलाखतीत 'भाग मिल्खा भाग' सिनेमाला आपण आधी नकार दिला होता असं म्हटलंय. तिनं सांगितलेलं कारण हैराण करणारं आहे.

प्रणाली मोरे

Divya Dutta refused Bhaag Milkha Bhaag : बॉलीवूड अभिनेत्री दिव्या दत्तानं नुकत्याच एका मुलाखतीत 'भाग मिल्खा भाग' विषयी बोलताना म्हटलं आहे की तिनं सुरुवातीला फरहान अख्तरच्या बहिणीची भूमिका साकारायला नकार दिला होता. दिव्या दत्ताचं म्हणणं आहे की फरहान तिचा क्रश होता आणि तिला त्याची बहिण मुळीच बनायचं नव्हतं.

'भाग मिल्खा भाग' सिनेमात दिव्या दत्तानं फरहान अख्तरच्या मोठ्या बहिणीची म्हणजे इसरी कौरची भूमिका साकारली होती. ही भूमिका तिनं इतकी उत्कृष्ट साकारली होती की तेव्हा तिची जोरदार प्रशंसा झाली होती. दिव्या दत्तानं सिनेमाला अनेक वर्ष झाल्यानंतर फरहान विषयीच्या आपल्या मनातील भावनांचा खुलासा केला आहे. (Divya Dutta refused bhaag milkha bhaag role..actress says..)

अभिनेत्री दिव्या दत्तानं या लेटेस्ट मुलाखतीत खूप किस्से शेअर केले आहेत. २०१२ साली आलेल्या 'भाग मिल्खा भाग' सिनेमातील भूमिकेविषयी जेव्हा दिव्या दत्ताला मुलाखतीत विचारलं तेव्हा अभिनेत्री म्हणाली,''ती भूमिका मला आधी करायची नव्हती कारण त्या दरम्यान फरहान माझा क्रश होता''.

दिव्या पुढे म्हणाली, ''मी सिनेमाला नकार दिला होता आणि म्हणाली होते, मी का त्याची बहीण बनू''. पण दिग्दर्शक राकेश ओम प्रकाश मेहरा मला म्हणाले,''तू एक कलाकार आहेस ना..मग त्या अनुषंगाने विचार कर''.

दिव्या दत्तानं 'भाग मिल्खा भाग'चा किस्सा शेअर करत म्हटलं की,'' सिनेमाचं शूटिंग सुरू होण्याआधी दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा तिच्याजवळ आले आणि म्हणाले,त्यांना तिला कोणाला तरी भेटवायचं आहे''.

'' मग एका व्यक्तीच्या खांद्यावर त्यांनी हात ठेवला तेवढ्यात ती व्यक्ती पटकन वळली आणि पाहू लागली..तेव्हा मला धक्का बसला अर्थात आश्चर्य अन् आनंदाचा..कारण तो फरहान अख्तर होता''.

दिव्या दत्ता म्हणाली,''मी फरहानला पाहतच राहिले आणि म्हणाले,हा मुळीच फरहान नाही..हा तर मिल्खा आहे..''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KDMC Election: “निवडणूक लढवता? मग हे लिहून द्याल का?” संकल्पनामा फेल झाला तर राजकारणालाही ब्रेक!

Malegaon News : तुकाराम मुंडेंच्या आदेशाला केराची टोपली; मान्यता रद्द असूनही मालेगावात अंधशाळा सुरूच

Union Budget 2026 : १ फेब्रुवारी रविवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार? शेअर बाजारही सुरू राहणार का?

मुस्ताफिजूर रहमानच्या हकालपट्टीचा राग बांगलादेशने भारतीय तरुणीवर काढला; ती म्हणाली, मला काही बोलायचे नाही, जय हिंद!

'अवैध धंदे बंद करताना कोणतीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी मागे हटणार नाही'; नीतेश राणेंचा स्पष्ट इशारा

SCROLL FOR NEXT