Divya Khosla Kumar's Mother Passes Away; Actress Mourns Demise SAKAL
मनोरंजन

Divya Khosla Kumar Mother: सुप्रसिद्ध बॉलीवूड निर्माती - अभिनेत्री दिव्या खोसला कुमारच्या आईचं निधन

दिव्याच्या आईचा मृत्यू कशामुळे झाला याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

Devendra Jadhav

Divya Khosla Kumar Mother Dead News: प्रसिद्ध निर्माती-दिग्दर्शक आणि अभिनेत्री दिव्या खोसला कुमार यांच्या कुटुंबाकडून एक दु:खद बातमी समोर येत आहे.

वास्तविक, अभिनेत्रीच्या आईचे निधन झाले आहे. त्यांनी स्वत: त्यांच्या सर्व प्रियजनांना ही दुःखद बातमी दिली आहे.

दिव्याने तिच्या आईचे अनेक सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत एक भावनिक चिठ्ठी लिहिली आहे. मात्र, दिव्याच्या आईचा मृत्यू कशामुळे झाला याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

(Divya Khosla Kumar's Mother Passes Away; Actress Mourns Demise)

दिव्याने सोशल मिडीयावर आई गेल्याबद्दल भावुक पोस्ट लिहीली आहे.. दिव्या लिहीते.. मम्मा.. मी माझी आई गमावली, माझ्या हृदयात कायमची पोकळी सोडून गेली.. मी तुझे अगाध आशीर्वाद आणि नैतिक मूल्ये सोबत घेऊन जाईल. तुझं मन खुप चांगलं होतं.

मी तुझ्यापोटी जन्मले याचा मला अभिमान आहे. माझे तुझ्यावर प्रेम आहे मम्मा.. ओम शांती…… अनिता खोसला यांची मुलगी.. अशी पोस्ट लिहीत दिव्याने भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान मार्चमध्ये दिव्याच्या चेहऱ्याला गालाच्या एका बाजूला गंभीर दुखापत झाल्याचे दिसत आहे. जखम खूप खोल दिसत नाहीय पण त्यामुळे तिचा चेहरा मात्र लालबुंद झालेला आहे.

दिव्यानं स्वतः फोटो शेअर करत लिहिलं आहे की-''आगामी प्रोजेक्टमध्ये अॅक्शन सीन करतेवेळी खूप वाईट पद्धतीनं मला दुखापत झाली.

पण काम सुरू ठेवावं लागलं. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची मला गरज आहे आणि या दुखापतीतून लवकर बरं होण्यासाठी ताकद देवानं द्यावी''.

दिव्या ही सुप्रसिद्ध निर्माते आणि T - Series चे हेड भुषण कुमारच्या पत्नी आहेत. दिव्या एक दिग्दर्शिका आणि अभिनेत्री आहे.

आईच्या जाण्याने दिव्या कोलमडून गेली असेल यात शंका नाही. फॅन्स दिव्याच्या आईच्या जाण्याबद्दल शोक व्यक्त करुन तिचं सांत्वन करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT