Diwali 2023: Esakal
मनोरंजन

Diwali 2023: टायगर - पठाण पुन्हा एकत्र! सिनेमा सुपरहिट होताच भाईजानने साजरी केली दिवाळी

बॉक्स ऑफिसवर 'टायगर 3' च्या दमदार ओपनिंगनंतर, सलमान खान आणि शाहरुख खान अर्पिता खानच्या दिवाळी पार्टीत एकत्र दिसले.

Vaishali Patil

 Arpita Diwali Party 2023: बॉलिवूडमध्ये सध्या दिवाळीचं सेलिब्रेशन मोठ्या उत्साहात सुरु आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनी आपल्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. ज्यात अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या घरी हजेरीही लावली. तर काल लक्ष्मी पुजनाच्या दिवशी सलमान खानची बहीण अर्पिता खान हिने देखील दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते.

दरवर्षी प्रमाणे यावेळीही अर्पिताच्या घरी कलाकारांनी हजेरी लावली. मात्र या पार्टीत सर्वांचे लक्ष वेधले ते सलमान खान आणि शाहरुखच्या जोडीने. 'टायगर 3' रिलीज झाल्यानंतर सलमान खानने त्याच्या बहिणीच्या दिवाळी पार्टीलाही हजेरी लावली होती.

सध्या दोघांचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावेळी शाहरुखने सिग्नेचर पोनीटेल लूकसह निळ्या रंगाचा पठाणी कुर्ता घातला होता. तर सलमान खान ब्लॅक लेदर पॅचवर्क ब्राऊन पँट आणि मरून आणि ब्लॅक शर्टमध्ये डॅशिंग दिसत होता. त्यामुळे या दोघांच्या जोडिने चाहत्यांची मनं जिंकून घेतली.

तर दुसरीकडे दिवाळीच्या मुहूर्तावर भाईजानचा टायगर 3 प्रदर्शित झाला मात्र या चित्रपटात शाहरुख खान भाव खाऊन गेला. किंग खान चित्रपटात सलमान खानला वाचवण्यासाठी येतो. सध्या सोशल मिडियावर त्यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहे.

चित्रपटाने बंपर ओपनिंग केली आहे. या चित्रपटाने 44 कोटींहून अधिक कलेक्शन केले आहे. हा चित्रपट सलमान खानच्या करिअरमधील सर्वात मोठा ओपनर ठरला तर विकेंडपर्यंत हा चित्रपट आणखी कमाल करेल अशी निर्मात्यांना अपेक्षा आहे.

या चित्रपटात सलमान खान, कतरिना कैफ, इमरान हाश्मी, रेवती आणि रिद्धी डोगरा यांच्यासह अनेक स्टार्सच्या भुमिका आहेत. शाहरुख खानच्या कॅमिओसोबत हृतिक रोशनने वॉरच्या कबीर सिंगच्या भूमिकेत खास कॅमिओ केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT