Diya And Baati fame kanishka soni says she is married to herself,calls herself goddess. Google
मनोरंजन

कनिष्का सोनीची खळबळजनक पोस्ट; म्हणाली,'स्वतःशीच लग्न केलं, मला पुरुष...'

कनिष्का सोनीनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत पोस्टच्या माध्यमातून आपल्या लग्नाविषयीचा धक्कादायक खुलासा केला आहे.

प्रणाली मोरे

Kanishka Soni: 'दीया और बाती' फेम कनिष्का सोनी(Kanishka Soni) सध्या भलतीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिनं एक पोस्ट केली होती. ज्यात ती गळ्यात मंगळसूत्र घातलेली आणि सिंदूर लावलेली दिसत होती. तिनं त्या फोटोला कॅप्शन दिलं होतं की,''मी स्वतःशीच लग्न केलं आहे, मला लग्नासाठी आयुष्यात कोणत्याही पुरुषाची गरज नाही''. कनिष्कानं हे देखील म्हटलं होतं की ती देवीचा अवतार आहे. कनिष्काच्या या पोस्टवर वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा पाऊस पडलेला पहायला मिळाला. तिनं आणखी एक पोस्ट केली होती ज्यात तिने म्हटलं होतं, कुणीतरी तिच्या लग्नासंबंधित पोस्टवर नाराज होऊन तिचं अकाउंट हॅक केलं आहे.(Diya And Baati fame kanishka soni says she is married to herself,calls herself goddess.)

अभिनेत्री कनिष्का सोनीच्या पोस्टमुळे तिचे चाहते मात्र हैराण झाले आहेत. ही पोस्ट जुनी आहे,परंतु आता अनेक दिवसांनी व्हायरल होत आहे. कनिष्कानं फोटो शेअर केला होता ज्यात तिनं सिंदूर लावलं आहे आणि गळ्यात मंगळसूत्र घातलं आहे. तिच्या कॅप्शननं खरंतर अधिक गोंधळ उडवून दिला आहे. तिनं लिहिलं आहे,''मी स्वतःशीच लग्न केलं आहे कारण मी स्वतः माझी सगळी स्वप्न पूर्ण केली आहेत,आणि केवळ एकच व्यक्ती माझ्या आयुष्यात आहे जिच्यावर मी प्रेम करते, आणि ती मी स्वतः आहे. मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता मिळाली आहेत, आयुष्यात मला पुरुषाची गरज नाही, मी आयुष्यात माझ्या स्वतःसोबत आणि माझ्या फेव्हरेट गिटारसोबत खूश आहे. मी देवी आहे,शक्तिशाली आणि मजबूत आहे. शिवा आणि शक्ती सगळे माझ्यातच वास करुन आहेत. धन्यवाद''.

कनिष्काच्या या पोस्टवर काही चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या तर काहींनी तिला ट्रोल केलं. आणखी एका पोस्टमध्ये तिनं लिहिलं होतं की,माझं फेसबूक कोणीतरी हॅक केलं आहे. हॅकर माझ्या लग्नाविषयी ऐकून कदाचित खूश नाहीत.

कनिष्का 'दीया और बाती', 'पवित्र रिश्ता', 'सावधान इंडिया' सारख्या मालिकांमधून दिसली आहे. आता कळत आहे की तिनं स्वतःशी केलेलं लग्न हे कोणत्याही लग्नाच्या विधी-परंपरा न पाळता केलं आहे, तिनं फक्त सोशल मीडियावर आपल्याला आयुष्यभर एकटं रहायला आवडेल ही इच्छा जाहीर केली आहे. त्यातच गुजरातमध्ये देखील काही दिवसांपूर्वी यासंबधीतच एक केस समोर आली होती. क्षमा बिंदु नावाच्या मुलीनं स्वतःशीच लग्न केल्याची घोषणा करुन सर्वांना हैराण केलं होतं. क्षमाचं ते लग्न चर्चेत आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT