Madhurani gokhale Prabhulkar  Instagram
मनोरंजन

'अशा अफवांवर विश्वास ठेवू नका'; 'अरुंधती'च्या 'त्या' फोटोची चर्चा

अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो पोस्ट केला आहे.

स्वाती वेमूल

Aai Kuthe Kay Karte 'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर Madhurani Prabhulkar सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. मधुराणीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. एका नव्या लूकमध्ये तिने हा फोटो पोस्ट केला असून त्याचसोबत चाहत्यांना तिने विनंती केली आहे. मधुराणी या फोटोमध्ये डेनिम जॅकेट आणि पँट अशा एकदम 'कूल' लूकमध्ये पहायला मिळत आहे. 'हा आहे अरुंधतीचा नवा लूक, अशा अफवांवर विश्वास ठेवू नका,' असं तिने या या फोटोच्या कॅप्शनमध्ये स्पष्ट केलं आहे. मालिकेतील कथानक पाहता आता अरुंधती तिचा लूक बदलणार की काय, असा प्रश्न चाहत्यांना पडू नये म्हणून तिने आधीच हे स्पष्ट केलं आहे.

मधुराणीच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट्स केले आहेत. 'अरुंधती अशी झाली तरी आवडेल,' असं एकाने म्हटलंय. तर 'असेल नवीन लूक तरी काही हरकत नाही. अरुंधती नेहमीच लाडकी आहे सर्वांची,' असं दुसऱ्याने लिहिलं. 'असा लूक ठेवा मग अनिरुद्धचा चेहरा बघण्यासारखा असेल,' असा सल्ला एकाने दिला आहे. याआधीही मधुराणीचा असाच एक लूक सोशल मीडियावर चर्चेत होता.

आई कुठे काय करते ही मालिका सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. अविनाशला पैशांची मदत करण्यासाठी अरुंधतीने समृद्धी बंगला गहाण ठेवला. ही गोष्ट देशमुख कुटुंबाच्या लक्षात आल्यानंतर प्रत्येकाकडूनच उलट सुलट प्रतिक्रिया मिळाल्या. अनिरुद्ध आणि संजनाने तर समृद्धी बंगला विकण्यासाठीचाच प्रस्ताव मांडला. मात्र या कठीण प्रसंगातही खचून न जाता अरुंधतीने ठामपणे उभं रहायचं ठरवलं आहे. घरात एकीकडे तणावाचं वातावरण असताना मालिकेत लवकरच एका नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Luggage Rules : विमानासारखेच नियम रेल्वेमध्येही लागू होणार! , ‘फर्स्ट एसी’मध्ये ७० किलो पर्यंतच सामान मोफत नेता येणार

IND vs SA, 4th T20I : शुभमन गिल खेळणार नाही, मैदानातही पोहचला नाही; मोठं कारण आलं समोर

SHANTI Bill: अणुऊर्जा क्षेत्रात ऐतिहासिक सुधारणा! शांती विधेयक लोकसभेत मंजूर; का ठरणार गेमचेंजर?

अश्लील व्हिडिओ बघत आहे म्हणून CBI ने पाठवला मेल; ओपन करताच दिसलं असं...नेमकी भानगड काय?

Latest Marathi News Live Update : अधिकारी-कर्मचारी महासंघाचा उद्यापासून ‘कामबंद’चा इशारा

SCROLL FOR NEXT