Akshay Vaghmare, Ankit Mohan in 'Pawankhind 'Movie Google
मनोरंजन

पावनखिंडीच्या रक्तरंजीत इतिहासातल्या या गोष्टी माहिती आहेत का?

दिग्पाल लांजेकर यांच्या चित्रपटातून त्या गोष्टी लवकरच रुपेरी पडद्यावर

प्रणाली मोरे

शिवकालिन इतिहासातील सुवर्णपान असणाऱ्या पावनखिंड(Pawankhind) चा उल्लेख येताच बाजीप्रभू देशपांडे यांच्या जोडीला आणखी दोन शूरवीरांची नावं अनाहूतपणे समोर येतात. शिवचरित्रातील या महत्त्वपूर्ण अध्यायातील दोन अजरामर नावं म्हणजे श्रीमंत कोयाजीराव बांदल आणि श्रीमंत रायाजीराव बांदल. लेखक दिग्दर्शक,अभिनेता दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टक या संकल्पनेतून पडद्यावर आलेल्या 'फर्जंद' आणि 'फत्तेशिकस्त' या चित्रपटानंतर 'पावनखिंड' हा तिसरा महत्त्वाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पावनखिंडीचा रक्तरंजित इतिहास सांगणाऱ्या या चित्रपटात कोयाजीराव आणि रायाजीराव या बांदल बंधूंनी दिलेल्या बलिदानाची आणि त्यांच्या शौर्याची गाथाही पहायला मिळणार आहे. १८ फ्रेब्रुवारीला 'पावनखिंड' हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. त्यांच्या शौर्याची गाथाही पहायला मिळणार आहे.

हिरडस मावळामध्ये रायाजीराव बांदल आणि कोयाजीराव बांदल यांच्या रुपात स्वराज्याला जणू दोन हिरेच गवसले होते. शूरवीर,धाडसी,निडर,वचनाला जागणारे आणि राजांसाठी प्राणांची बाजी लावणारे असे कितीतरी गुण या बांदल बंधूंच्या अंगी ठासून भरले होते. त्या काळरात्री बाजीप्रभू देशपांडे,फुलाजी प्रभू,यांच्यासह रायाजीराव बांदल यांनी आपल्या ३०० कडव्या बांदल सेनेच्या साथीने घोडखिंड अडवून धरली आणि पराक्रमाची शर्थ करीत अखेरच्या श्वासापर्यंत गनिमांची वाट रोखून ठेवली. 'पावनखिंड' चित्रपटातून बाजीप्रभूंनी दिलेल्या बलिदानाच्या निमित्तानं रायाजीराव-कोयाजीराव या दोन पराक्रामी बंधूंचा थरारक लढाही पहायला मिळणार आहे. या चित्रपटात अभिनेते अजय पूरकर यांनी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली असून.अंकित मोहन यानं रायाजीराव बांदल तर अक्षय वाघमारे यांने कोयाजीराव बांदल यांची भूमिका साकारली आहे.

दिग्दर्शनासोबत या सिनेमाच्या लेखनाची जबाबदारी दिग्पाल लांजेकर यांनी उचलली आहे. या चित्रपटात चिन्मय मांडलेकर शिवाजी महाराजांच्या रुपात दिसणार आहे.तर मृणाल कुलकर्णी राजमाता जिजाऊ बनल्या आहेत. याशिवाय वैभव मांगले,हरिश दुधाडे,माधवी निमकर,प्राजक्ता माळी,उज्ज्वला जोग असे मराठीतील अनेक मातब्बर कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या व्यक्तीरेखा साकारताना दिसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Ambajogai Crime : अडीच वर्षाच्या चिमुरडीवर १३ वर्षाचा अल्पवयीन मुलाचा अत्याचार; मुलावर गुन्हा दाखल

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

SCROLL FOR NEXT