Amitabh Bachchan, Amitabh Bachchan news, Amitabh Bachchan bike ride news, Amitabh Bachchan police SAKAL
मनोरंजन

Amitabh Bachchan: अखेर डॉनला पोलीसांनी अटक केलीच... हेल्मेट प्रकरणानंतर अमिताभ बच्चन यांची नवीन पोस्ट चर्चेत

मुंबई वाहतूक पोलिस अमिताभ बच्चन यांना हेल्मेट न घातल्याप्रकरणी दंड ठोठावणार असल्याचे बोलले जात होते.

Devendra Jadhav

Amitabh Bachchan New Post News: अमिताभ बच्चन हे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. बिग बी यांचा एका रस्त्यावरील व्यक्तीकडे लिफ्ट मागण्याचा व्हिडिओ भलताच व्हायरल झाला होता.

त्यावर चाहत्यांनी त्यांचे कौतूकही केले होते. मात्र आता मुंबई पोलिस अमिताभ यांच्यावर कारवाई करणार असल्याची चर्चा होती.

मुंबई वाहतूक पोलिस अमिताभ बच्चन यांना हेल्मेट न घातल्याप्रकरणी दंड ठोठावणार असल्याचे बोलले जात होते. अशातच अमिताभ बच्चन यांनी एक नवीन फोटो पोस्ट केलाय ज्याची चर्चा आहे.

(Don finally arrested by the police... Amitabh Bachchan's new post in discussion after the helmet case)

अमिताभ बच्चन यांनी त्याचा एक फोटो शेअर केला होता आणि विनोद केला होता की त्याने एका अनोळखी व्यक्तीकडून लिफ्ट घेतली, फक्त नंतर त्यांनी हे उघड केले की हा फोटो एका शुटिंगमधला होता.

शुक्रवारी याच प्रकरणाची गंमत करताना अमिताभ यांनी एक नवीन पोस्ट केलीय. पोलिस जीपच्या बाजूला उभे असताना अमिताभ यांनी उदास दिसत असलेला एक फोटो शेअर केला आणि त्याला कॅप्शन दिले, “अॅरेस्टेड”.

अमिताभ बच्चन यांचा हा फोटो पाहून चाहत्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. एका चाहत्याने टिप्पणी केली, “ तुमचा स्वॅग नक्कीच उत्कृष्ट आहे!” दुसर्‍याने कमेंट केली,

“डॉन…..डॉन…..डॉन…….डॉन का इंतजार तो 11 मुझको की पुलिस कर रही है! लेकीन डॉन को पकडना मुश्कील ही नहीं, नमुमकिन है! (11 देशांचे पोलीस डॉनची वाट पाहत आहेत पण त्याला पकडणे अवघडच नाही तर अशक्य आहे).

आणखी एकाने कमेंट केली, “आखिरकर डॉन को मुंबई पोलिस ने पकड लिया (शेवटी मुंबई पोलिसांनी डॉनला पकडले). अशाप्रकारे अमिताभ बच्चन सध्या चांगलेच जोमात आहेत असं दिसतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT