Kranti Redkar Esakal
मनोरंजन

Kranti Redkar: 'मुर्ख बनू नका..', वानखेडेंची बायको क्रांती रेडकरचा निशाणा कुणाकडे? पोस्ट व्हायरल

Vaishali Patil

Kranti Redkar Video Viral: बेहिशोबी मालमत्ता आणि अन्य भ्रष्टाचार प्रकरणाबरोबरच आर्यन खानची सुटका करण्यासाठी २५ कोटींची लाच मागितल्याप्रकरणी सीबीआयने समीर वानखेडे यांची शनिवारी ५ तास चौकशी केली . आज पुन्हा सकाळी 11 वाजता समीर वानखेडे यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

त्यातच हाय-प्रोफाइल क्रूझ प्रकरणाच्या तपासादरम्यान समीर वानखेडेने उच्च न्यायालयात त्यांच्या बचावात चॅट्स सादर करून वर्तन नियमांचे उल्लंघन केलं असल्याच एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले. आता याच प्रकरणात वानखेडे यांच्यावर दररोजच नवनवीन आरोप होत आहे.

तर दुसरीकडे एनसीबीचे माजी अधिकारी वानखेडे म्हणाले, “माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून तपासात मी सहकार्य करेन. वंदे मातरम."

आता त्यातच समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर हिने सोशल मिडियावर तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने कुणाचंही नाव न घेता तिच्या नवऱ्याविरुद्ध होणाऱ्या कारवाईबद्दल भाष्य केले आहे.

क्रांतीने अतिशय मार्मिकपणे तिचं मत या व्हिडिओच्या माध्यमातुन माडलं आहे. खरतरं क्रांतीनं या व्हिडिओत सत्याचा खरा अर्थ काय हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

ती या व्हिडिओत म्हणते की, 'मुर्ख बनण्याच्या दोन पद्धती आहेत. एक म्हणजे, जे खरं नाही त्यावर विश्वास ठेवणं आणि दुसरं म्हणजे सत्य काय आहे यावर विश्वास ठेवण्यास नकार देणं. पुन्हा ऐका, समजून घ्या मुर्ख बनू नका.' त्याच बरोबर तिने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिते की, The truth shines like no diamond ever.

याआधीही क्रांती पतीवर लावण्यात आलेले सारेच आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रकरणावर सविस्तर बोलतांना क्रांती म्हणाली होती की, “त्यांच्याविरोधातील सर्व आरोप खोटे आहेत, हे प्रत्येकाला माहित आहे. हे फक्त आरोप आहेत आणि आम्ही सीबीआयच्या चौकशीसाठी पूर्ण सहकार्य करत आहोत. आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही चौकशीला पूर्णपणे सहकार्य करतोय”.

अभिनेत्री म्हणून क्रांती रेडकर हिनं मराठी मनोरंजन विश्वात स्थान निर्माण केलं आहे. ती नेहमीच आपल्या घरचे व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते .त्या व्हिडिओमुळे ती चर्चेतही असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal: मला एक दिवस कॅप्टन व्हायचंय! जैस्वालची 'मन की बात'; शुभमन गिलसमोर उभा राहिला स्पर्धक

Prashant Kishor Statement : बिहार निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेनंतर, आता प्रशांत किशोर यांनी केलं मोठं विधान, म्हणाले...

PM Modi Calls Chief Justice Gavai: सरन्याधीश गवईंना पंतप्रधान मोदींचा फोन; सर्वोच्च न्यायालयातील 'त्या' घटनेची घेतली गंभीर दखल!

तयारीला लागा! सोलापूर जिल्ह्यातील १७ पैकी ‘या’ १३ नगरपरिषदांमध्ये महिला होणार नगराध्यक्षा; नगरसेवकांच्या आरक्षणाची बुधवारी सोडत

Pune News : आमदार बापू पठारे यांना धक्काबुक्कीप्रकरणी २० जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT