Doordarshan’s famous news anchor Gitanjali Iyer passed away
Doordarshan’s famous news anchor Gitanjali Iyer passed away sakal
मनोरंजन

Gitanjali Aiyar Passed Away: दूरदर्शनच्या लोकप्रिय न्यूज अँकर गीतांजली अय्यर यांचे निधन..

नीलेश अडसूळ

दूरदर्शनमध्ये न्यूज अँकर म्हणून यशस्वी कारकीर्दीनंतर, गीतांजली यांनी कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि मार्केटिंगच्या जगात प्रवेश केला. त्या उद्योग संघटना CII च्या सल्लागारही होत्या. त्यांनी 'खानदान' या मालिकेतही काम केले होते.
Gitanjali Aiyar Passed Away: पत्रकारिता जगतातून एक दुःखद वार्ता समोर आली आहे. दूरदर्शनच्या पहिल्या फळीतील इंग्रजी न्यूज अँकरपैकी एक असलेल्या गीतांजली अय्यर यांचे बुधवारी निधन झाले आहे.

गीतांजली अय्यर ७२ वर्षांच्या होत्या. आजवरच्या नामवंत वृत्त निवेदकांमध्ये त्यांच्या नावाचा समावेश आवर्जून केला जातो. जवळपास ३० वर्षांहून अधिक काळ त्यांनी दूरदर्शनवर अँकरिंग केले.

दूरदर्शन मध्ये वृत्तनिवेदक म्हणून १९७१ मध्ये त्यांनी जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर त्यांनी सलग तीन दशके आपल्या अमोघवाणीने वृत्तनिवेदन केले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांना चार वेळा सर्वोत्कृष्ट अँकरचा पुरस्कार मिळाला आहे.

(Doordarshan’s famous news anchor Gitanjali Iyer passed away)

दूरदर्शनमध्ये न्यूज अँकर म्हणून यशस्वी कारकीर्द केल्यानंतर गीतांजली यांनी कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि मार्केटिंगच्या जगातात प्रवेश केला. त्या 'CII' या उद्योग संघटनेच्या सल्लागारही होत्या.

विशेष म्हणजे त्यांच्या आवाजा इतकेच दिसणेही सुरेख होते. त्या पत्रकारिता जगतातल्या स्टार अँकर होत्या. अनेकांनी त्यांना अभिनय करण्याचेही सल्ले दिले होते. याच आग्रहाखतर त्यांनी 'खानदान' या मालिकेत काम केले होते.

याशिवाय जाहिरात क्षेत्रातही त्या सक्रियपणे वावरल्या. गीतांजली यांनी त्या काळातील अनेक ब्रँडसाठी काम केले होते. त्यांच्या निधनाने पत्रकारिता विश्वात शोकळला पसरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; सूत्रांची माहिती

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी अमित शहा आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT