Dr amol kolhe injured during shivputra sambhaji marathi drama play in karad sakal
मनोरंजन

Amol Kolhe Injured: अभिनेते अमोल कोल्हेंना गंभीर दुखापत, 'शिवपुत्र संभाजी'च्या प्रयोगादरम्यान अपघात..

घोड्यावरून मंचांकडे येत असताना हा अपघात झाला आहे.

नीलेश अडसूळ

Amol Kolhe Injured: अभिनेते आणि राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याबाबत या गंभीर घटना घडली आहे. कराड येथे 'शिवपुत्र संभाजी' या नाटकाच्या प्रयोगादरम्यान त्यांचा अपघात झाला असून त्यांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यावेळी त्यांच्या पाठीला मार बसला. या अपघाताबाबत अमोल कोल्हे यांनी स्वत: व्हिडीओ शेअर करत माहिती दिली आहे.

(Dr amol kolhe injured during shivputra sambhaji marathi drama play in karad)

सध्या डॉ. अमोल कोल्हे यांच्या 'शिवपुत्र संभाजी' या महानाट्याचे महाराष्ट्र भरात जोरदार प्रयोग सुरू आहेत. औरंगाबाद , कोल्हापूरनंतर आता हा दौरा कराड मध्ये आला आहे. पण कराड मध्ये प्रयोग सुरू असताना अमोल कोल्हे यांना गंभीर दुखापत झाली आहे

रविवारी रात्री कराड येथे शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या प्रयोग सुरू होता. सगळं काही सुरळीत पार पडत होते पण अमोल कोल्हे यांची घोड्यावरून एन्ट्री होत असतानाच घोड्याचा पाय दुमडला गेला. ज्यामध्ये अमोल कोल्हे घोड्यावरून खाली कोसळले. यामुळे त्यांच्या पाठीला जबर मार बसला.

पाठीला दुखापत झालेली असतानाही त्यांनी हा प्रयोग पूर्ण केला. पुढचे प्रयोग मात्र सध्या होणार नाहीत. केवळ १ मे महाराष्ट्र दिनी होणारा 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचा कराडमधील प्रयोग होणार असून उर्वरित दोन्ही प्रयोग रद्द करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे अमोल कोल्हे चांगलेच चर्चेत आले आहेत.

अमोल कोल्हे यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. दुखापत झाली असली तरी १ मे रोजीचा प्रयोग करण्याचा निर्धार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला. पुढे दोन ओरययोग रद्द झाले असले तरी ११ मे पासून पिंपरीतील एच.ए. मैदानावरील प्रयोग तितक्याच तडफेने सादर केले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: गौतम अदानी शरद पवारांच्या भेटीला! सिल्व्हर ओक निवासस्थानी सांत्वन भेट

Manipur Government Formation Update: मणिपूरमध्ये सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग!, भाजपसह सर्व ‘NDA’ आमदारांना दिल्लीला बोलावले

Latest Marathi News Union Budget 2026: व्हेनेझुएलाकडून भारत तेलाची खरेदी करणार - डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

Nagpur Municipal Corporation: नागपूर महानगरपालिकेत भाजपने १०२ नगरसेवकांचे राजीनामे घेतले; नेमकं कारण काय?

Pune News : वैद्यकीय पर्यटनाला मिळेल चालना, आयात शुल्क कमी केल्याने औषधे स्‍वस्‍त; आरोग्य क्षेत्रातील तज्‍ज्ञांनी व्‍यक्‍त केले समाधान

SCROLL FOR NEXT