Dr amol kolhe with wife Dr Ashwini kolhe Instagram
मनोरंजन

'१४ वर्षांच्या सहवासात दोन पाहुणे घराबाहेरच ठेवले'; पत्नीसाठी अमोल कोल्हेंची खास पोस्ट

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पत्नीसोबतचे फोटो पोस्ट करत व्यक्त केल्या भावना

स्वाती वेमूल

अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे Amol Kolhe यांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पत्नीसाठी फेसबुकवर खास पोस्ट लिहिली आहे. पत्नी अश्विनी कोल्हे Ashwini Kolhe यांच्यासोबतचे काही फोटो पोस्ट करत त्यांनी ही पोस्ट लिहिली. अभिनेता ते यशस्वी राजकारणी, या अमोल कोल्हेंच्या प्रवासात त्यांच्या पत्नीचा मोलाचा वाटा आहे. अमोल आणि अश्विनी यांच्या लग्नाला १४ वर्षे पूर्ण झाली असून या १४ वर्षांच्या सहवासाचं फलित नक्कीच चांगलं आहे, अशी भावना त्यांनी या पोस्टमधून व्यक्त केली.

अमोल कोल्हेंची पोस्ट-

'१४ वर्षांच्या वनवासाचं फलित काय असतं ते माहित नाही, पण १४ वर्षांच्या सहवासाचं फलित नक्कीच चांगलं आहे. माणूस म्हणून समृद्ध होणं, संसाराच्या परिघात व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करणं, परस्परपूरक भूमिका घेणं या प्रत्येक गोष्टीत आणखी सुधारणा होत असताना, दोन पाहुणे मात्र आजवर घराबाहेरच ठेवले आहेत ताटकळत.. १) 'तू चूक' आणि २) 'मीच बरोबर'. कारण तेवढं केलं की सहवासाबरोबरच विरहाच्याही प्रत्येक क्षणाचा सोहळा होतो. समाधानाच्या उंबरठ्याच्या आत सुख नांदतं यावरचा विश्वास दृढ करणाऱ्या सहचारिणीस लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा,' अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

अश्विनी यासुद्धा डॉक्टर आहेत. अमोल आणि अश्विनी यांना आद्या आणि रुद्र ही दोन मुलं आहेत. आद्याने 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतदेखील काम केलं आहे. अमोल हे सोशल मीडिया अकाऊंट्सवर त्यांची पत्नी आणि मुलांसोबतचे फोटो पोस्ट करत असतात. त्यांच्या यशात पत्नी भागीदार असल्याचं ते वेळोवेळी या पोस्टमधून निदर्शनास आणतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT