Lata Mangeshkar 
मनोरंजन

लता मंगेशकरांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांची माहिती

त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

स्वाती वेमूल

गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्यावर अद्याप अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा असल्याची माहिती डॉक्टर प्रतीक समदानी यांनी दिली. लतादीदींना कोरोनाची लागण झाल्यानं त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. लतादीदींना कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत, मात्र त्यांचं वय ९२ वर्षे असल्याने त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती मंगेशकर कुटुंबीयांच्या वतीने देण्यात आली. लतादीदींच्या प्रकृतीत सुधारणा असून त्या बऱ्या होत असल्याची माहिती त्यांची भाची रचना शाह यांनी मंगळवारी दिली. (Lata Mangeshkar Health Update)

कोरोनातून बरं होण्यासाठी किमान सात दिवस लागतात, त्यामुळे लतादीदींना अजून रुग्णालयातच उपचार घ्यावे लागतील, असंही त्यांच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केलं. ब्रीच कँडी रुग्णालयाचे डॉ. प्रतीक समदानी आणि त्यांचं पथक लतादीदींवर उपचार करत आहेत.

लतादीदींना कोविड न्युमोनिया झाला असून पुढील सात-आठ दिवस त्यांना रुग्णालयातच राहावं लागेल, असं डॉ. समदानी यांनी पत्रकारांना सांगितलं. लतादीदींना शनिवारपासूनच ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं असून ऑक्सिजनची गरज भासली नाही. त्यांचं वय पाहता डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

Maratha Reservation: मनाेज जरांगेंना ज्योती मेटेंचा थेट सवाल; ‘१२ मागण्या मान्य झाल्या, मग मुंबईला जाण्याचा हट्ट कशासाठी?’

Marathi News Live Updates : जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा तरुणांचा आक्रमक एल्गार, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

SCROLL FOR NEXT