जखमी पक्ष्यासमोर चिमुकलीकडून गायत्री मंत्राचा जप; पहा शिल्पाच्या मुलीचा व्हिडीओ

समिषाच्या या व्हिडीओने जिंकली नेटकऱ्यांची मनं
Samisha
Samisha Instagram

अभिनेत्री शिल्पा शेट्टीची (Shilpa Shetty) मुलगी समिषा (Samisha) हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती तिच्या घरासमोरील बागेत जखमी पक्ष्याला पाहून तो बरा व्हावा यासाठी गायत्री मंत्र म्हणताना दिसतेय. या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत तिची आई शिल्पासुद्धा आहे. शिल्पाने सोशल मीडियावर जखमी पक्ष्याबद्दलची पोस्ट लिहिल्यानंतर पेटा (PETA) या संस्थेकडून त्याच्यावर उपचार करण्यात आले.

या व्हिडीओच्या सुरुवातीला समिषा बागेत पाठमोरी उभी असताना दिसते. तिच्यामागे कॅमेरा घेऊन उभी असलेली शिल्पा तिला विचारते, "समिषा, तू प्रार्थना करत आहेस का? पक्ष्याला बरं वाटावं म्हणून, तो बरा व्हावा म्हणून तू प्रार्थना करत आहेस का?" आईचं हे बोलणं ऐकून समिषा पक्ष्याकडे बोट दाखवत बोलण्याचा प्रयत्न करते, "बर्डी बू बू". समिषा लवकरच दोन वर्षांची होणार आहे. मुलीला समजावण्याचा प्रयत्न करत शिल्पा म्हणते, "तो पक्षी जखमी आहे. उपचार घेऊन तो बरा होईल लवकर. तू त्याच्यासाठी प्रार्थना करतेयस का?" असं म्हणत असताना शिल्पासुद्धा मुलीसोबत प्रार्थना करू लागते. मायलेकीच्या या व्हिडीओने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.

Samisha
नाद खुळा! 'पुष्पा'मधल्या 'श्रीवल्ली' गाण्याचं मराठमोळं व्हर्जन

मुलीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करताना शिल्पाने लिहिलं, 'लहान मुलांचं मन खरंच पवित्र असतं. समिषा अजून दोन वर्षांचीही झाली नाही. पण सहानुभूती आणि एखाद्यासाठी प्रार्थना करण्याची तिची भावना पाहून माझंही मन भरून आलं. ही गोष्ट आपल्यासारख्या मोठ्यांनाही कळू शकली असती तर बरं झालं असतं. त्या पक्ष्याचे प्राण वाचवल्याबद्दल पेटाचे आभार.'

शिल्पाने सरोगसीच्या माध्यमातून १५ फेब्रुवारी २०२० रोजी समिषाला जन्म दिला. गर्भपातानंतर सरोगसीचा पर्याय निवडल्याचं शिल्पाने एका मुलाखतीत सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com