Dream Girl 3 Ayushmann Khurrana Esakal
मनोरंजन

Ayushmann Khurrana: 'ड्रीम गर्ल 3' बनवणार का? आयुष्मान म्हणतोय,..

Vaishali Patil

Dream Girl 3: बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना हा सध्या त्याच्या 'ड्रीम गर्ल 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.त्याचा हा सिनेमा रिलिज होऊन आता बरेच दिवस झाले असले तरी तो प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे. 'पूजा'चा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला आहे.

या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 88.91 कोटींची कमाई केली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आयुष्मानने 'ड्रीम गर्ल 3' बद्दल मोठी हिंट दिली आहे.

चित्रपटाच्या सिक्वेलबाबत बोलतांना तो म्हणाला की, "तुम्हाला तुमच्या आधीच्या चित्रपटात जे यश मिळालेले असतं तो बेंचमार्क असतो. तिथपर्यंत पून्हा पोहचणे महत्वाचे असते. मात्र तुम्ही त्याच्या 70 टक्के पर्यंत जरी पोहचला तरी पुरेसे आहे परंतु तुम्हाला कमीत कमी 70 टक्क्यापर्यंत पोहचणे गरजेचे असते

अभिनेता पुढे म्हणाला, 'त्यामुळे नक्कीच अपेक्षा असेल आणि ही अपेक्षा आपल्याला एका नव्या सुरुवातीकडे घेवुन जाईल. मला वाटतं की सिक्वेलप्रती लोकांच प्रेम नेहमीच कायम राहिल. हे कोविड महामारीपूर्वीचं होते आणि आता ते गदर 2, OMG 2, ड्रीम गर्ल 2 बरोबर परत येत आहे. मात्र जर चित्रपट चांगला नसेल तर तो चालणार नाही.'

याचदरम्यान त्याला जेव्हा आयुष्मानला तो 'ड्रीम गर्ल 3' बनवणार का? असा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी तो म्हणाला की, 'मला माहित नाही चित्रपटाचे दिग्दर्शक राज शांडिल्य हेच याबाबत जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकतात.'

'ड्रीम गर्ल 2' मध्ये आयुष्मान व्यतिरिक्त अनन्या पांडे, परेश रावल, मनजोत सिंह, सीमा पाहवा, अन्नू कपूर, राजपाल यादव, अभिषेक बॅनर्जी, असरानी, ​​विजय राज आणि मनोज जोशी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. सर्वच कलाकरांनी त्याच्या भुमिकेने प्रेक्षकांची मन जिंकली.

आयुष्मान खुराना यापुर्वी अॅन अॅक्शन हिरो, डॉक्टर जी, अनिक यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसला होता. मात्र त्याचे हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. त्यानंतर आता त्याच्या 'ड्रीम गर्ल 2' ला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT