Drishyam 2 first Look release,ajay Devgan post on social media viral
Drishyam 2 first Look release,ajay Devgan post on social media viral Google
मनोरंजन

Drishyam 2: हत्यार हातात घेऊन उभा दिसला विजय साळगावकर,'दृश्यम 2'च्या फर्स्ट लूकची हवा

प्रणाली मोरे

Drishyam 2: चला, एक छोटीशी गोष्ट ऐकूया...दिवस होता २ ऑक्टोबरचा. विजय साळगावकर आपल्या कुटुंबासोबत पणजीला स्वामी चिन्मयानंद यांच्या सत्संगासाठी जात होता. तिथे त्यांनी वाटेत एका हॉटेलमध्ये पावभाजी खाल्ली आणि दुसऱ्या दिवशी ३ऑक्टोबरला पूर्ण कुटुंब घरी परतलं. बस्स..ही एवढी छोटी गोष्ट ऐकल्यानंतर आपण अंदाज बांधला असेलच की आपण बोलतोय अजय देवगणच्या 'दृश्यम' सिनेमाविषयी. या सिनेमाचा सीक्वेल आता आपल्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. दृश्यम २ चा फर्स्ट लूक रीलिज करण्यात आला आहे. मेकर्सनी सोशल मीडियावर या सिनेमाचा फर्स्ट लूक रीलिज केला आहे.

'दृश्यम १' मधील याच कहाणीची आठवण करुन देत अजय देवगणनं 'दृश्यम २' चे पोस्टर शेअर केले आहे. सिनेमाचा टीझर शुक्रवारी ३० सप्टेंबर रोजी रीलिज केला जाणार आहे. अजयनं सिनेमाचा फर्स्ट लूक शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे,''२ आणि ३ ऑक्टोबरला काय झालेलं लक्षात आहे नं? विजय साळगावकर पुन्हा एकदा आपल्या कुटुंबासोबत तुम्हाला भेटायला येत आहे''.

या फोटोत अजय देवगण सिनेमातील आपल्या दोन मुली आणि बायकोच्या भूमिकेत असलेल्या श्रिया शरन सोबत दिसत आहे. मेकर्सनी अद्याप कोणाचाही चेहरा समोर आणलेला नाही. बरोबर एक दिवस आधी अजयनं सिनेमातील गोष्टीत ज्या-ज्या हत्यारांचा समावेश आहे ती हातात घेतलेला फोटो शेअर करत प्रेक्षकांना जुन्या गोष्टीची आठवण करून दिली आहे. या सिनेमात तब्बू देखील मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.

अजय देवगणचा 'दृश्यम' सिनेमा २०१५ साली रीलिज झाला होता. या सिनेमाला दिवंगत दिग्दर्शक निशिकांत कामतने त्यावेळी दिग्दर्शित केले होते. 'दृश्यम'मध्ये अजय देवगण,श्रिया शरन, तब्बू,इशिता दत्ता,रजत कपूर आणि मृणाल जाधव यांच्या मुख्य भूमिका होत्या. हा सिनेमा २०१३ मध्ये रीलिज झालेल्या मल्याळम सिनेमाचा रीमेक होता. मल्याळम सिनेमात मोहनलाल मुख्य भूमिकेत होता. साऊथचा 'दृश्यम २' गेल्या वर्षी रीलिज झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Latest Marathi News Live Update: 'पन्नू हत्येप्रकरणी भारताच्या तपास अहवालाची वाट पाहतोय': अमेरिका

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT