Drishyam 
मनोरंजन

'दृश्यम २'च्या निर्मात्याविरुद्ध गुन्हा दाखल

चित्रपटाची घोषणा होताच निर्माण झाली मोठी अडचण

स्वाती वेमूल

गेल्या अनेक दिवसांपासून 'दृश्यम' Drishyam या चित्रपटाच्या सीक्वेलची चर्चा होती. अखेर मंगळवारी या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा झाली. 'दृश्यम २' Drishyam 2 या मल्याळम चित्रपटाचे हिंदी रिमेक करण्यासाठी हक्क विकत घेतले गेले आहेत. मात्र आता हिंदी रिमेक अडचणीत सापडला आहे. कारण या चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Drishyam 2 runs into trouble legal suit filed against its producer)

'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, 'दृश्यम'च्या पहिल्या भागाची निर्मिती पॅनारोमा, कुमार मंगत यांच्यासह 'व्हायकॉम १८ मोशन पिक्चर्स'ने केली होती. आता दुसऱ्या भागासाठी कुमार मंगत आणि पॅनारोमा यांनी एकत्र येऊन व्हायकॉम १८ला बाजूला सारल्याची माहिती समोर येत आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या भागावर आपलाही हक्क असल्याचं 'व्हायकॉम १८'चं म्हणणं आहे.

हेही वाचा : गायक लकी अलीच्या निधनाच्या चर्चांवर मैत्रिणीचा खुलासा

निर्मात्यांविरुद्ध गुन्हा दाखल

'व्हायकॉम १८'ने आता चित्रपटाच्या निर्मात्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी लवकरच सुनावणी होणार आहे. 'दृश्यम' या चित्रपटात अभिनेता अजय देवगण, तब्बू, श्रिया सरन आणि इशिता दत्ता मुख्य भूमिकेत दिसले होते. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

मल्याळममध्ये तयार झालेल्या 'दृश्यम' या चित्रपटाचे दिग्दर्शन जीतु जोसेफ यांनी केले होते. त्यात प्रसिद्ध अभिनेता मोहनलाल याने मुख्य भूमिका साकारली आहे. तर हिंदीत प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांनी पहिल्या भागाचे दिग्दर्शन केले होते. त्यांचे गेल्या वर्षी निधन झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यातून गरिबी संपली, एकही माणूस सापडणार नाही; मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली घोषणा

Latest Marathi News Live Update : दक्षिण मुंबईत आज भाजपचं मूक आंदोलन

iPhone ला टक्कर देणारा जबरदस्त मोबाईल; आता मिळतोय चक्क 42 हजारचा डिस्काउंट, Samsung च्या 'या' प्रीमियम फोनने तोडले सगळे रेकॉर्ड

Pune Graduates Constituency : पुणे पदवीधर मतदारसंघात महायुतीतच मतभेद; भाजपकडून शरद लाड उमेदवार, अधिकृत घोषणा दिल्लीतून

Stock Market Holiday : नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात इतके दिवस शेअर बाजार राहणार बंद! जाणून घ्या कधी ?

SCROLL FOR NEXT