Drishyam 2
Drishyam 2 Bollywood movies
मनोरंजन

Drishyam2: विजय पुन्हा त्याच्या कुटुंबाचे रक्षण करू शकतो का? चित्रपटाचे शूटिंग सुरू

सकाळ डिजिटल टीम

अजय देवगण (Ajay Devgn) आणि श्रिया सरन (Shriya Saran) यांचा 2015 मध्ये रिलीज झालेला 'दृश्यम' (Drishyam), मोहनलालच्या चित्रपटाचा रिमेक असलेला थ्रिलर चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप गाजला आणि प्रेक्षकांना उत्सुकता सोडली. कलाकारांच्या मोठ्या समुहापासून ते कथा, अभिनय, दृष्यमच्या सर्व गोष्टींनी मनं जिंकली होती. प्रेक्षक या थ्रिलर ड्रामाच्या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत असताना, नुकतेच अजय देवगण आणि श्रिया सरन यांनी अखेर 'दृश्यम 2' (Drishyam2) च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. (Drishyam Bollywood movie Shooting)

सोशल मीडियावर, अजयने 'दृष्यम 2' च्या सेटवरील एक स्टिल फोटो शेअर केला ज्यामध्ये तो सहकलाकार श्रिया आणि दिग्दर्शक अभिषेक पाठक (Abhishek Pathak) यांच्यासोबत एका दृश्यावर चर्चा करताना दिसला. 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' अभिनेता विजय साळगावकरच्या भूमिकेत दिसणार आहे तर श्रिया त्याची पत्नी नंदिनीची भूमिका साकारणार आहे. पोस्टर शेअर करताना अजयने लिहिले की, “विजय पुन्हा त्याच्या कुटुंबाचे रक्षण करू शकतो का? #Drishyam2 शूट सुरु होत आहे" आणि यावेळी चित्रपट काय ऑफर करेल असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

Drishyam 2

दरम्यान, या चित्रपटाबद्दल बोलताना अजय देवगणने सांगितले की, तो 'दृश्यम 2'चा एक भाग बनण्यास उत्सुक आहे आणि तो चित्रपटाची वाट पाहत आहे. "दृश्यम 2 सोबत आणखी एक मनोरंजक कथा सादर करताना मला आनंद होत आहे. विजय एक बहुआयामी पात्र आहे आणि तो पडद्यावर एक आकर्षक कथा तयार करतो," तो पुढे म्हणाला. 2020 मध्ये निधन झालेल्या निशिकांत कामत (Nishikant Kamat) यांनी दृष्यमचे नेतृत्व केले होते आणि आता अभिषेक कामत (Abhishek Kamat) या प्रकल्पाचे नेतृत्व करणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत पवारांना पाहण्यासाठी गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरी झाली आहे

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: दमदार सुरुवातीनंतर चेन्नई संघ सापडला अडचणीत; दुबेनंतर जडेजाही स्वस्तात बाद

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

SCROLL FOR NEXT