deepika sara shraddha
deepika sara shraddha 
मनोरंजन

ड्रग्स कनेक्शन: दीपिका, सारा, श्रद्धासोबत ७ जणांना एनसीबीने बजावले समन्स, तीन दिवसात हजर राहण्याचे दिले आदेश

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- सुशांत सिंह राजपूत मृत्य प्रकरणात ड्रगच्या दिशेने तपास सुरु आहे. या ड्रग कनेक्शनमध्ये बॉलीवूडच्या अनेक बड्या सेलिब्रिटींची नावं समोर आली आहेत. दीपिका पदूकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि श्रद्धा कपूर यांना एनसीबीकडून समन्स बजावण्यात आले आहेत. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, या सेलिब्रिटींविरोधात ड्रगची मागणी केल्याप्रकरणी पुरावे मिळाले आहेत. याच्याशी संबधित त्यांची चौकशी केली जाईल.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, एनसीबीकडून आत्तापर्यंत सात जणांना समन्स पाठवले असल्याचं कळतंय. दीपिका पदूकोणसोबत ज्यांची नावं ड्रग कनेक्शनमध्ये समोर आली आहेत त्यांना एनसीबी चौकशीसाठी समन्स पाठवत आहे. त्यांना येत्या तीन ते चार दिवसांच्या आत चौकशीसाठी बोलवलं जाण्याची शक्यता आहे. दीपिका पदूकोणच्या चॅटचा खुलासा झाला होता ज्यामध्ये तिच्यावर आरोप लावले गेले होते की ती ड्रग्सची मागणी करतेय. क्वान कंपनीमध्ये काम करणा-या करिश्मासोबत ती यासंबंधी मागणी करत असल्याचं निदर्शनास आलं होतं. 

मिळालेल्या माहितीनुसार, दीपिका पदूोकोण गोव्यात आहे. दीपिकाच्या ज्या करिश्मासोबत ड्रगसंबंधी चॅट झालं होतं ती देखील काही कामानिमित्त गोव्यात आहे. याव्यतिरिक्त अभिनेत्री सारा अली खान देखील तिची आई अमृता सिंहसोबत गोव्यातील घरी आहे. रिया चक्रवर्तीने ड्रग प्रकरणात सारा अली खानचं नाव सगळ्यात आधी घेतलं असल्याचं म्हटलं जातं. 

एनसीबीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सगळ्यांविरोधात आधी पुरावे गोळा केले गेले आहेत. अनेकजणांचे जबाब नोंदवले गेले आहेत. रिया चक्रवर्तीचा जबाब देखील या प्रकरणात आधी नोंदवला गेला आहे. त्यानंतर यांच्याविरोधात पुरावे गोळा केले गेले आहेत. इतकंच नाही तर एनसीबीने या सेलिब्रिटींच्या विरोधात पुरावे गोळा करण्याआधी अनेक ड्रग पेडलर्सची चौकशी केल्याचं कळतंय.    

drug connection deepika sara shraddha kapoor summons by ncb  


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सांगोल्यात संतप्त मतदाराने EVM मशिन पेटवली

"मी हत्या केलीच नाही," हत्येचे 8 गुन्हे असलेल्या महिलेने भर कोर्टात नाकारले आरोप; वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT