Dulhania 3 movie update Janhvi Kapoor replace Alia Bhatt in Dulhania Opposite Varun Dhawan Report Esakal
मनोरंजन

Dulhania 3: वरुणला मिळाली नवी 'दुल्हनिया'! आलिया नव्हे तर कुणासोबत जमणार जोडी?

'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' आणि 'बद्रीनाथ की दुल्हनिया' नंतर आता वरुण घेऊन येतोय 'दुल्हनिया3'

Vaishali Patil

Varun Dhawan's Dulhania 3: सध्या वरुण धवन त्याच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. वरुण VD18 चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त असतानाच आता त्याच्या आणखी एका सिनेमाची चर्चा आहे. तो सिनेमा म्हणजे 'दुल्हनिया 3'. 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' आणि 'बद्रीनाथ की दुल्हनिया' या सिनेमात वरुण आणि आलियाच्या जोडीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' नंतर दहा वर्षांनी या सिनेमाचा सिक्वेल 'बद्रीनाथ की दुल्हनिया' रिलीज झाला होता. त्यानंतर आता करण जोहर या फ्रँचायझीचा तिसरा भाग रिलिज होणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहे. हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र या चित्रपटात आता आलिया आणि वरुणची जोडी रंगणार नसल्याचं बोललं जात आहे.

तर आता आलिया भट्टची जागा बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने घेतली आहे. या चित्रपटात वरुण धवनसोबत जान्हवी रोमान्स करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग या वर्षी सुरू होणार आहे.

मात्र आता आलिया या चित्रपटातून का बाहेर पडली यामागचे कारण समोर आलेले नाही, तर दुसरीकडे 2024 मध्ये तिच्याकडे बरेच सिनेमे असल्याने तिने हा सिनेमा नाकारला असल्याचे सांगितले जात आहे.

मात्र, आलियाचा हा सिनेमा नाकारणे हे जान्हवीसाठी खुप फायदेशीर ठरणार आहे. निर्माता करण जोहर याचवर्षी जान्हवी आणि वरुणसोबत चित्रपटाच्या शूटिंग करणार आहे. मात्र याबाबत अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खेतान करणार असून या सिनेमाची कथा मागील दोन्ही चित्रपटांपेक्षा वेगळी असणार आहे. चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनचे काम सुरू झाले आहे.

'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' 2014 मध्ये रिलीज झाला होता आणि 'बद्रीनाथ की दुल्हनिया' 2017 मध्ये रिलीज झाला होता. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. पहिल्या चित्रपटाने 120 कोटी रुपये तर दुसऱ्या चित्रपटाने 200 कोटींचा गल्ला जमवला.

आता 'दुल्हनिया 3'मध्ये वरुण आणि जान्हवीची जोडी दुसऱ्यांदा दिसणार आहे. यापुर्वी दोघेही नितेश तिवारी यांच्या 'बावल' चित्रपटात दिसले होते. चाहत्यांना वरुण आणि जान्हवीची केमिस्ट्री आवडली होती. त्यामुळे आता या चित्रपटातही ही जोडी जमली तर दुल्हनिया 3 देखील हिट होईल यात शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT