Dunki release and review updates:  Esakal
मनोरंजन

Dunki Twitter Review: डंके की चोटपर 'डंकी' चालणार की नाही? नेटकऱ्यांनी काय सांगितलं?

Dunki release and review updates: पठाण-जवाननंतर आता शाहरुख खानचा 'डंकी' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र नेटकऱ्यांना डंकी आवडला की नाही?

Vaishali Patil

Dunki Twitter Review:  बॉलीवूडच्या किंग खानने पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार एंट्री केली आहे. जवान आणि पठाणनंतर आता शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'डंकी' थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून शाहरुख आणि राज कुमार हिराणीचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने प्रतिक्षा करत होते आणि अखेर तो सिनेमा बॉक्स ऑफिसवर धडकला आहे. रिलिज होताच शाहरुखचा डंकी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

शाहरुख खान स्टारर आणि राजकुमार हिरानी दिग्दर्शित डंकी चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मिडियावर पोस्ट करण्यास सुरुवात केली आहे. आता नेटकऱ्यांना शाहरुखचा डंकी कसा वाटला आणि तो बॉक्स ऑफिसवर पठाण आणि जवान सारखा जबरदस्त कमाई करु शकले का आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल की नाही हे जाणुन घेऊया. फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर रिव्ह्यूमध्ये नेटकरी काय सांगतात यावर नजर टाकूया.

शाहरुख खानचा 'डंकी' अखेर गुरुवारी, २१ डिसेंबर रोजी जगभरात प्रदर्शित झाला असून जगभरातील चाहत्यांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. 'डंकी'चा पहिला शो न्यूझीलंडमध्ये झाला आणि एका प्रेक्षकाने X हँडलवर चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर केला आहे.

यात त्याने लिहिले की, “पहिला हाफ पूर्ण झाला आहे. डंकी एक भावनिक रोलर कोस्टर आहे. जो तुम्हालाला एकाच वेळी हसवेल आणि त्याच क्षणी रडवेल, विकी कौशलची आठवण येईल आणि हो 'हार्डी एक नमुना नाही तर तो किंग खान आहे."

यासोबत त्याने एक व्हिडिओ शेयर केला आहे ज्यात त्याने जुन्या शाहरुख खानला पुन्हा पडद्यावर आणल्याबद्दल राजकुमार हिरानी यांचे आभार मानले आहे. यासोबतच सर्वांना चित्रपट पाहण्याचे आवाहन केले.

तर दुसऱ्या युजरने लिहिले की, “राजकुमार हिरानी यांनी पटकथेचा उत्कृष्ट नमुना पुन्हा एकदा भेटीला आणला आहे. पटकथा उत्कृष्ट आहे, अभिनय उत्कृष्ट आहे आणि हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील मास्टरपीसमध्ये नेहमीच गणला जाईल. दिग्दर्शनाच्या दृष्टिकोनातून, मला वाटत नाही की राजकुमार हिरानी यांच्यापेक्षा कोणीही चांगले काम करू शकेल. ,

तर एका यूजरने लिहिले, "गेटी गॅलेक्सीमध्ये डंकीचा फर्स्ट डे फर्स्ट शो हाऊसफुल्ल आहे, जनता वेडी झाली आहे. 1000 कोटी लोडिंग. तर दुसऱ्याने डंकीच्या पहिल्या शोसाठी आलेल्या प्रेक्षकांच्या गर्दीची झलकही दाखवली."

शाहरुख खानचे कौतुक करताना दुसऱ्या यूजरने लिहिले, "व्वा. शाहरुख खानच्या कारकिर्दीतील हा सर्वोत्तम चित्रपट आहे, जो मी पाहिला. #डंकी. अप्रतिम कथाकथन, अप्रतिम अभिनय."

थंडीच्या दिवसातही डंकीच्या पहाटेच्या शोला चाहत्यांची गर्दी केली आहे. सोशल मीडियावर शाहरुख खानच्या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत आहे. एकाने लिहिले. "फायनल रिव्ह्यू डंकी... हिरानींनी आग लावली." तर दुसर्‍याने लिहिले, "डिंकी वन वर्ड रिव्ह्यू – मास्टरपीस."

शाहरुख खान आणि राजकुमार हिरानी यांचा डंकी हा उत्कृष्ट देशभक्तीपर चित्रपट आहे. असं दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Shubman Gill : शुभमन गिलची स्पर्धेतून माघार; ब्लड टेस्टनंतर फिजियोने BCCI ला पाठवला अहवाल अन्...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात सध्या तणावपूर्ण शांतता

SCROLL FOR NEXT