dunki teaser shah rukh khan marathi veteran actress jyoti subhash with srk in dunki SAKAL
मनोरंजन

Dunki Drop 1: शाहरुखच्या डंकीमध्ये झळकल्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री! सर्वांना सुखद धक्का

शाहरुख खानच्या डंकी सिनेमाचा टीझर रिलीज झालाय. त्यात ज्येष्ठ मराठी अभिनेत्रीची एक झलक पाहायला मिळतेय

Devendra Jadhav

Dunki Teaser: शाहरुख खानचा आज वाढदिवस. शाहरुख खानच्या वाढदिवसाला त्याच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित डंकी सिनेमाचा टीझर भेटीला आलाय.

डंकी सिनेमाचा टीझर खळखळुन हसवतो. शाहरुखचा रॉकींग अंदाज डंकीच्या टीझरमध्ये पाहायला मिळतो. टीझरमध्ये एक खास गोष्ट दिसतेय ज्यामुळे मराठी लोकांना सुखद धक्का बसलाय. टीझरमध्ये अवघ्या काही सेकंदात येऊन एका मराठी अभिनेत्रीने भाव खाल्लाय. कोण आहे ही अभिनेत्री? आम्ही तुम्हाला सांगतो.

(dunki teaser shah rukh khan marathi veteran actress)

शाहरुखच्या डंकीमध्ये चमकल्या या ज्येष्ठ अभिनेत्री

शाहरुखच्या डंकी सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला. टीझर सर्वांना आवडलेला दिसतोय. शाहरुखच्या डंकीमध्ये ज्येष्ठ मराठी अभिनेत्रीने तिच्या अभिनयाने चांगलाच भाव खाल्लेला दिसतोय. या अभिनेत्री म्हणजे ज्योती सुभाष.

ज्योती सुभाष शाहरुखच्या डंकीमध्ये आजीच्या भुमिकेत दिसत आहेत. शाहरुखच्या मित्राची आई त्याला आजीची शपथ घ्यायला सांगते. त्यावेळी ज्योती सुभाष म्हणतात, अरे सारखी माझीच शपथ का घेता? आणि पुढे त्यांंचं निधन झालेलं दिसतं. हा धम्माल कॉमेडी प्रसंग पाहून हसायला येतं.

ज्योती सुभाष शाहरुखसोबत झळकल्या

ज्योती सुभाष शाहरुखसोबत डंकीमध्ये झळकल्या आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. ज्योती सुभाष या गेली अनेक वर्ष मराठी मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. नाटक, मालिका, सिनेमा, शॉर्ट फिल्मस अशा विविध माध्यमांमध्ये ज्योती सुभाष यांनी काम केलंय.

ज्योती या गेल्या काही वर्षांपासुन हिंदी इंडस्ट्री सुद्धा गाजवत आहेत. त्यांनी रणवीर सिंग सोबत गली बॉस सिनेमात अभिनय केला होता. आता शाहरुखच्या डंकी सिनेमात ज्योती सुभाष यांना पाहण्याची उत्सुकता आहे.

या तारखेला डंकी होणार रिलीज?

डंकीचा टीझर आल्यापासुन शाहरुख खानच्या सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. डंकी सिनेमात शाहरुखशिवाय तापसी पन्नू, दिया मिर्झा, बोमन इराणी हे देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर विकी कौशल या चित्रपटात कॅमिओ करणार अशी चर्चा आहे.

डंकी सिनेमा २१ डिसेंबरला संपूर्ण भारतात रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: गडचिरोलीत पुरामुळे अडकलेले विद्यार्थी प्रशासनाच्या तत्परतेने परीक्षेसाठी दिल्ली रवाना

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT