ED Raid On LYCA Productions:
ED Raid On LYCA Productions: Esakal
मनोरंजन

ED Raid On LYCA Productions: ईडीचा चीडी डाव? ऑस्कर विजेत्या RRR अन् मणिरत्नम PS च्या निर्मांत्यावर कारवाई

Vaishali Patil

ED Raid On LYCA Productions: चेन्नईतील चित्रपट निर्मिती कंपनी LYCA प्रॉडक्शनवर अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने मंगळवारी छापे टाकले. Lyca Productions हे दक्षिण भारतातील सर्वात मोठं प्रॉडक्शन हाऊस आहे. एसएस राजामौलीचा RRR, अल्लू अर्जुनचा पुष्पा: द राइज, रजनीकांतचा २.० आणि ऐश्वर्या राय बच्चनचा पोन्नियिन सेल्वन असे हिट चित्रपट याच बॅनरखाली बनवण्यात आले आहेत.

लायका प्रॉडक्शनच्या परिसरात हे छापे टाकले असल्याची पोलीस सूत्रांनी ही माहिती दिली. मात्र, या छाप्याबाबत प्रॉडक्शन कंपनीकडून तातडीने कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्रीय तपास संस्थेने प्रॉडक्शन हाऊसविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवल्यानंतर चेन्नईतील सुमारे आठ परिसरांचा तपास सुरू आहे. Lyca Productions ची स्थापना 2014 मध्ये सुबास्करन अलीराजा यांनी केली होती.

Lycaproductions हा Lycamobile चा उपसमूह आहे. जो दक्षिण भारतात बनवलेल्या चित्रपटांचे प्रॉडक्शन आणि वितरण पाहतो.

ईडीने टी नगर, अड्यार आणि करपक्कमसह लायकाच्या आठ ठिकाणांवर ही छापे मारी केली आहेत. ईडीचा हा छापा फेमा उल्लंघनाशी संबंधित प्रकरणात टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये पीएमएलए शुल्काचाही समावेश करण्यात आला आहे.

एका निवेदनात, ईडीने आरोप केला की, "मार्टिन आणि त्याच्या सहयोगी कंपन्या आणि संस्थांनी 01.04.2009 ते 31.08.2010 या कालावधीत बक्षीस विजेत्या तिकिटांचे दावे करून बेकायदेशीर नफा कमावला, ज्यामुळे सिक्कीम सरकारचे 910 कोटी रुपयांचे नुकसान झाले.

गेल्या काही वर्षांत लायका प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनलेले अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आहेत. यापैकी राम चरण आणि ज्युनियर एनटीआर स्टारर चित्रपट आरआरआरने केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात नाव कमावले.

गेल्या काही वर्षांत लायका प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनलेले अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आहेत. यापैकी राम चरण आणि ज्युनियर एनटीआर स्टारर चित्रपट आरआरआरने केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात नाव कमावले. याशिवाय कब्जा, थुनिवू आणि २.० ने या चित्रपटांनीही बंपर कमाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT