मनोरंजन

आठ वर्षांनंतर अमेय पुन्हा संगीत नाटकात

सकाळवृत्तसेवा

"संगीत संशयकल्लोळ' या नाटकाने तिसऱ्या दिवशी वसंतोत्सवाची सांगता होणार आहे. त्यात फाल्गुनरावांची भूमिका साकारणाऱ्या अमेय वाघ याच्याशी नीला शर्मा यांनी साधलेला संवाद

प्रश्‍न : प्रायोगिक व व्यावसायिक नाटकांबरोबरच चित्रपटांमध्येही जोरदार कामगिरी करत असताना मध्येच संगीत नाटकात कसा? 

अमेय ः आठ वर्षांपूर्वीही मी संशयकल्लोळ नाटकात फाल्गुनरावांचीच भूमिका साकारली होती. शिवाय, "कट्यार काळजात घुसली' आणि "मानापमान'मध्येही काम केलं होतं. संगीत नाटकांशी माझी ओळख झाली तीच मुळात राहुल देशपांडेमुळे. या नाटकांची भाषा आणि संगीत फार वेगळं वाटलं. अतिशय भावलं. नाट्यसंगीत या प्रकाराशी नातं जुळलं ते राहुलमुळेच. त्याच्या सहवासात संगीत नाटकात काम करण्याचा, त्या मंतरलेल्या वातावरणाचा जबरदस्त अनुभव घेता आला. ज्या मित्रामुळे हे सारं घडलं त्याचं आयोजन असलेल्या या संगीतोत्सवात आठ वर्षांनंतर पुन्हा तीच भूमिका साकारण्याची संधी मिळाली, याचा फार आनंद वाटतो. वसंतोत्सवात माझा सहभाग पहिल्यांदाच आहे. 

प्रश्‍न : आता पुन्हा संगीत नाटकात काम सुरू करणार आहेस का? 
अमेय ः ही एका प्रयोगापुरतीच भूमिका आहे. मात्र, पूर्वी केलेल्या जोरदार तालमींमुळे माझे संवाद सहज आठवत गेले. पोहणं येणाऱ्याला जसं कितीही काळाचं अंतर पडून पोहायला लागलं तर तो मागचं न विसरता पोहायला लागेल तसं घडलं. दरम्यान, कलाकार म्हणून माझीही समज पूर्वीपेक्षा वाढली. तेव्हा मी एकवीस-बावीस वर्षांचा होतो. आतापर्यंतच्या निरनिराळ्या भूमिकांमुळे या भूमिकेची जाण वाढलेली आहे. रसिकांसमोर या भूमिकेत यायला मीही उत्सुक आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai : मरीन ड्राइव्हवर भीषण अपघात, २ दुचाकींची धडक; वृद्धासह तरुण-तरुणीचा मृत्यू

Stock Market Today: शेअर बाजारात सेन्सेक्स 400 अंकांनी वर; Mahindra ची तब्बल 10% झेप; पण Adani शेअर्सवर गुंतवणूकदारांची नजर

Chhatrapati Sambhajinagar: कांदा रडवतोय; बळिराजा दुहेरी संकटात; पैठण तालुक्यातील स्थिती ; मिळतोय मातीमोल दर अन् अवकाळीची टांगती तलवार

Junnar Environment: हिवरेतील १८० वर्षे जुने ‘महोगनी’ धोक्यात; डॉ. गिब्सन यांच्या हस्ते १८० वर्षांपूर्वी रोपण, खोड जाळल्याने वृक्षप्रेमी संतप्त

Latest Marathi News Live Update : विदर्भात सूर्य आग ओकतोय, वर्ध्यात पारा 46 अंशांवर

SCROLL FOR NEXT