marathi movie : मराठी मनोरंजनविश्वात दिमाखात पाऊल टाकत एकाहून एक दर्जेदार चित्रपट घेऊन जिओ स्टुडिओज सज्ज झाले आहे. ‘जिओ स्टुडिओज’च्या ‘एक दोन तीन चार’ या आगामी चित्रपटाची आज घोषणा करण्यात आली असून नवीन वर्षात हा चित्रपट आपल्या भेटीला येणारं आहे. एक नाविन्यपूर्ण अशी जोडी म्हणजेच अभिनेता निपुण धर्माधिकारी आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी यांची प्रमुख भूमिका या चित्रपटात असणार आहे.
महत्वाचं म्हणजे या सिनेमाचं दिग्दर्शन वरुण नार्वेकर यांनी केलं आहे, ज्यांच्या बहुचर्चित ‘मुरांबा’ या चित्रपटानंतरचा हा पुढील चित्रपट असणार आहे. निपुण आणि वैदेही या कथानकातील जोडपं आयुष्याच्या अगदी तरूणाईच्या म्हणजे साधारण २३ व्या वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतं आणि मग या जोडप्याबरोबरच त्यांच्या जवळच्या मंडळींचीही सुरु होते तारेवरची कसरत! या सर्व प्रवासात नक्की काय-काय घडणार हे प्रत्यक्ष चित्रपटात पाहणं उत्सुकतेच असणारं आहे.
‘एक दोन तीन चार’ बद्दल सांगताना चित्रपटाचे दिग्दर्शक वरुण नार्वेकर म्हणतात, “आजच्या तरुणाईला जो चित्रपट आवडेल, चित्रपटाची कथा त्यांना त्यांच्या जवळची वाटेल; असा चित्रपट करण्याची माझी इच्छा होती. कारण लग्न हा असा विषय आहे की तो तुम्ही कुठल्याही वयात करण्याचा निर्णय घेतलात तरी त्यात गुंतागुंत असते आणि इथे तर आजकालच्या तुलनेत, अति लवकर लग्न करण्याचा निर्णय हे जोडपं घेतं. मला खात्री आहे की ही रोलरकोस्टर लव्हस्टोरी’ सर्वांनाच आपलीशी वाटेल.”
जिओ स्टुडिओज प्रस्तुत, बहावा एंटरटेनमेंट आणि १६ बाय ६४ प्रोडक्शन अंतर्गत, रणजीत गुगळे, केयूर गोडसे, निपूण धर्माधिकारी, निरज बिनीवाले, निर्मित 'एक दोन तीन चार' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.