Tarla joshi
Tarla joshi  Team esakal
मनोरंजन

‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ च्या अभिनेत्री तरला जोशी यांचे निधन

युगंधर ताजणे

मुंबई - साराभाई व्हर्सेस साराभाई,(sarabhai vs sarabhai) एक हजारो में मेरी बहना है (ek hazaaron mein meri behna hai) या मालिकेतून आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची पसंती मिळवलेल्य़ा अभिनेत्री तरला जोशी (Actress Tarla Joshi) यांचे निधन झाले आहे. टीव्ही कलाकार म्हणून त्या तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी काम केले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकताच मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रेटींनी त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे. (ek hazaaron mein meri behna hai sarabhai vs sarabhai actress tarla joshi passes away)

अभिनेत्री निया शर्मा (actress nia sharma) यांनी सोशल मीडियावरुन (social media) ही माहिती दिली आहे. नियानं तरला जोशी यांच्या सोबत एक हजारो में मेरी बहना है या मालिकेत काम केले होते. नियानं तरला जोशी यांच्या सोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. त्या फोटोला कॅप्शन देताना तिनं त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे. मोठी आजी मला तुमची नेहमीच आठवण येत राहिल, तरलाजी आपण नेहमी माझ्य़ा मोठ्या आजी होत्या.

tarla joshi
tarla joshi

तरला यांनी एक हजारो में मेरी बहना है मध्ये बडी बीजी यांची भूमिका साकारली होती. ती मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. तरला जोशी यांच्या निधनानंतर टीव्ही इंडस्ट्रीमधील अनेक सेलिब्रेटींनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

तरला जोशी यांची आणखी एक ओळख सांगायची झाल्यास त्यांनी साराभाई व्हर्सेस साराभाई आणि बंदिनी सारख्या मालिकांमध्येही काम केले होते. त्यातील त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. साराभाई व्हर्सेस साराभाई मालिकेत त्या इंद्रवनती आई म्हणून लोकप्रिय झाल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT