Ekda Yeun Tar Bagha News: Esakal
मनोरंजन

Ekda Yeun Tar Bagha: काय सांगता! भाऊ कदम यांच्या दर्शनाला भाविकांच्या लांब रांगा, काय घडलं असं?

Bhau Kadam will still be seen in the movie 'Ekda yeun Tar Bagha'

Vaishali Patil

Ekda Yeun Tar Bagha News:

मराठी मनोरंजन विश्वातील विनोदी अभिनयासाठी प्रसिद्ध असलेले भाऊ कदम हे लोकप्रिय कलाकार आहेत. चला हवा येऊ द्याच्या माध्यमातून प्रेक्षकांचं चांगलं प्रेम मिळवल्यानंतर आता भाऊ कदम हे चित्रपटांच्या माध्यामातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. आपल्या विनोदाच्या अचूक टायमिंगने ते प्रेक्षकांना मनमुराद हसवतात. त्यामुळेच अभिनेता भाऊ कदम यांचा चाहता वर्ग देखील खुप मोठा आहे.

चाहत्यांना आपल्या आवडत्या कलाकाराला भेटण्याची इच्छा भेट असते. मात्र भाऊ कदम यांना भेटण्यासाठी तर लोकांच्या लांब रांगा लागत आहेत. वाचून आश्चर्य वाटलं असेल ना पण हे घडतयं त्यांचं दर्शन मिळावं यासाठी झुंबड उडतेय. मात्र ते का होतय याचा खुलासा होणार आहे 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटात.

'एकदा येऊन तर बघा' या आगामी चित्रपटात भाऊ कदम एका खास भूमिकेत दिसणार आहेत. ‘बाबा गुलाबी गरम’ नावाची भुमिका ते या चित्रपटात साकारणार आहेत. अडचणीत असलेल्या भक्तांना मार्गदर्शन देणारे ‘बाबा गुलाबी गरम’ यांची लीला प्रेक्षकांना या चित्रपटात पहायला मिळणार आहे.

८ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या चित्रपटातून लेखक-दिग्दर्शक प्रसाद खांडेकर त्याचे दिग्दर्शकीय पदार्पण करीत आहे.

आपल्या भूमिकेविषयी सांगताना भाऊ कदम म्हणाले , खूप मजेशीर अशी ही व्यक्तिरेखा आहे. हा ‘बाबा गुलाबी गरम’ प्रेक्षकांचं नक्कीच मनोरंजन करेल असा विश्वास ते व्यक्त करतात.

'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटातील कलाकारांबद्दल बोलयाचं झालं तर भाऊ कदम यांच्या सोबत गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे तेजस्विनी पंडित, पॅडी कांबळे, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर, विशाखा सुभेदार, राजेंद्र शिसातकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने, सुशील इनामदार हे या चित्रपटात अभिनय करणार आहेत.

'एकदा येऊन तर बघा' चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमार मोहंती, दिपक क्रिशन चौधरी, सेजल दिपक पेंटर यांची असून सहनिर्मिती अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी, डॉ. झारा खादर यांची आहे.

कथा परितोष पेंटर यांची असून पटकथा, संवाद प्रसाद खांडेकर यांचे आहेत. छायांकन योगेश कोळी तर संकलन निलेश गावंड यांचे आहे. मनोज अवना आणि कृपाल सिंग कार्यकारी निर्माते आहेत. लाईन प्रोड्युसर मंगेश जगताप आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gotya Gitte: वाल्मिक कराड माझे दैवत, धनंजय मुंडेंना बदनाम करु नका, नाहीतर... फरार गोट्या गित्तेची जितेंद्र आव्हाडांना धमकी, व्हिडिओ व्हायरल

PM Narendra Modi : जागतिक अनिश्‍चिततेत राष्ट्रहित जपणार; ‘स्वदेशी’ वापरण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

Harshwardhan Sapkal : काँग्रेसचा विचार हा पाकिस्तानचे दोन तुकडे करणारा

Rahul Mote : परंडा मतदारसंघांमध्ये पुन्हा वाजणार का? 'घड्याळाची ठकठक' घड्याळ तेच वेळ नवी!

MP Nilesh Lanke : अहिल्यानगर शहर पोलिस प्रशासनावर राजकीय दबाव; खासदार नीलेश लंके यांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT