Ekta Kapoor news
Ekta Kapoor news esakal
मनोरंजन

Ekta Kapoor: तापसी कंगनाची स्वस्त कॉपी? एकताचं सणसणीत उत्तर

युगंधर ताजणे

Ekta Kapaoor Reacts on Kangana VS Taapsee: टीव्ही मनोरंजन विश्वातील क्वीन असं जिला म्हटलं जातं त्या एकता कपूरची गोष्ट काही औरच आहे. आती ती तिच्या एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. (Kahani ghar ghar ki) एकताची सर्वाधिक गाजलेली मालिका कहानी घर घर की ही पुन्हा एका टीव्हीवर झळकणार आहे. त्य़ाचे प्रमोशन सध्या जोरदार सुरु असल्यानं एकतानं काही नव्या - जुन्या गोष्टींना उजाळा देण्यास सुरुवात केली (entertainment news) आहे. काही दिवसांपूर्वीच तिनं कहानी घर घर की मधील प्रमुख अभिनेत्री साक्षी तंवर जिनं पार्वतीची भूमिका केली होती तिच्याविषयी मोठा खुलासा केला होता.

एकता म्हणाली होती की, साक्षीला मी जेव्हा पार्वतीची भूमिका करायची आहे असे (bollywood actress) सांगितले तेव्हा तिनं चक्क नकार दिला होता. तिला ती भूमिका पसंत नव्हती. अखेर तिला समजावण्यात मला यश आले. एकतानं आता (taapseee pannu) कंगना रनौतच्या एका प्रतिक्रियेवर उत्तर दिलं आहे. त्याचे झाले असे की, कंगनानं एकदा तिच्या मुलाखतीमध्ये तापसी पन्नुवर टीका केली होती. (kangana ranaut) कंगना आणि तापसी यांच्यातील छत्तीसचा आकडा चाहत्यांना नवीन नाही. त्या सतत एकमेकांवर टीका करत असतात. यात कंगनानं तापसीवर शेलक्या शब्दांत टिप्पणी केली होती.

कंगना तापसीला म्हणाली, ती माझी स्वस्तातील कॉपी आहे. यामुळे मी तिचं म्हणणं फारसं मनावर घेत नाही. यावर एकतानं उत्तर दिलं आहे . ती म्हणते, कंगना आणि तापसी या दोन्ही जबरदस्त अभिनेत्री आहेत. त्यांचा चाहतावर्गही मोठा आहे. त्यांच्यात एक गोष्ट समान आहे ती म्हणजे त्या आपल्या वाटा स्वत: निर्माण करणाऱ्या अभिनेत्री आहे. त्यांना विशेष ओळखीची काही गरज नाही. तुम्ही त्या दोन्ही अभिनेत्रींना लक्ष्य करणं पहिल्यांदा बंद करा. त्यांच्यातील भांडणं उगाचच वाढवण्यात काहीही अर्थ नाही. असेही एकतानं यावेळी सांगितले.

सध्या तापसी तिच्या दोबारा नावाच्या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. अनुराग कश्यप दिग्दर्शित या चित्रपटामध्ये तापसी एका वेगळ्या भूमिकेत समोर येणार आहे. मिराज नावाच्या इटालियन चित्रपटाचा दोबारा हा हिंदी रिमेक असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Summer Health Care : उन्हाळ्यात अशक्तपणाचा वाढतोय धोका.! कसा करावा उष्माघातापासून बचाव ?

Sharad Pawar Poster: "चहावाल्याचे दुकान फक्त साखरवाला बंद करू शकतो...." पवारांच्या प्रचारसभेतील बोर्ड होताहेत तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT