ekta kapoor file image
मनोरंजन

मराठी कलाकारामुळे एकता कपूर टेलिव्हिजन क्वीन

एकताने तिच्या करिअरची सुरूवात 1995 साली पडोसन या मालिकेतून केली.

प्रियांका कुलकर्णी

मुंबई - प्रसिद्ध दिग्दर्शिका आणि निर्माती एकता कपूरच्या अनेक मालिकांनी गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. तिच्या क्योंकी सास भी कभी बहू थी, कहानी घर घर की, कसौटी जिंदगी की, बडे अच्छे लगते है या मालिकेंना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. एकताने तिच्या करिअरची सुरूवात 1995 साली पडोसन या मालिकेतून केली. त्यानंतर तिने कॅप्टन हाऊस, मानो या ना मानो या मालिकांची निर्मीती केली.तिच्या या सर्व मालिकांना फारसे यश मिळाले नाही त्यामुळे अनेक निर्मात्यांनी तिच्या मालिकांवर पैसे गुंतवण्यास नकार दिला. त्यानंतर तिचे वडिल म्हणजेच प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र कपूर यांनी तिला मालिकांचे दिग्दर्शन करणे सोडण्याचा सल्ला दिला. पण तरी देखील एकताने हार मानली नाही. तिने 1995मध्ये विनोदी मालिका करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मात्र एकताच्या करिअरला नवी ओळख मिळाली.(ekta kapoor become star due to ashok saraf hum paanch)

एकताने 1995 साली 'हम पांच' नावाची मालिका करण्याचा निर्णय घेतला. या मालिकेमध्ये मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांनी प्रमुख भूमिका साकारली. अशोक सराफ यांच्या विनोदी शैलीमुळे ही मालिका सुपरहिट ठरली. एका मुलाखतीमध्ये एकताने सांगितले की, अनेक वेळा या मालिकेमधील संवाद हे साधे असायचे पण आपल्या अनुभवाच्या जोरावर अशोक सराफ त्याचे रूपांतर विनोदात करत होते. हम पांच या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाल्याने दिग्दर्शक म्हणून अनेक एकतावर अनेक निर्माते पैसे गुंतवण्यासाठी तयार झाले.

एकताच्या बालाजी टेलिफिल्म हे प्रोडक्शन हाऊसने आजवर अनेक नवोदित कलाकरांना छोट्या पडद्यावर काम करण्याची संधी दिली आहे. एकता आज यशाच्या शिखरावर फक्त हम पाच या मालिकेमुळे आहे आणि ही मालिका हिट ठरण्याचे कारण अभिनेते अशोक सराफ हे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैभव सूर्यवंशी म्हणजे भारतीय क्रिकेट नाही! १५ वर्षीय खेळाडूला टीम इंडियात संधी देण्याच्या विरोधात उभा राहिला दिग्गज, म्हणाला...

Sinhgad Palace History : सिंहगडावरचा भव्यदिव्य राजवाडा कोणी विकला? थक्क करणारा इतिहास अन् दुर्मिळ फोटो पाहा

Kerala Monsoon Update : माॅन्सूनचा केरळात पोहोचण्याचा मुहूर्त हुकला, महाराष्ट्रात कधी येणार? पुढील 2-3 दिवस काही भागात पावसाची शक्यता

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Latest Marathi News Live Update : ठाण्यात शिवसेनेवर भाजपचं दबाव तंत्राची चर्चा सुरू

SCROLL FOR NEXT