मुंबई ः छोट्या पडद्यावरची क्वीन समजल्या जाणाऱ्या एकता कपूरने आतापर्यंत अनेक मालिकांची व चित्रपटांची निर्मिती केली आहे. वेबविश्वातही तिने आपले नाणे खणखणीत वाजविले आहे. अल्ट बालाजीतर्फे तिने वेबसीरीज काढलेल्या आहेत. कित्येक नवोदित तरुण-तरुणींना तिने संधी दिली आहे. सध्या कोरोनामुळे सगळे चित्रीकरण बंद झालेले आहे
संपूर्ण इंडस्ट्री ठप्प झाली आहे आणि चित्रीकरण कधी सुरू होणार याबाबत कुणीच काही सांगू शकत नाही. विशेष म्हणजे या चित्रीकरण बंदचा अधिक फटका इंडस्ट्रीत काम करणाऱ्या कामगारांना
बसलेला आहे. दैनंदिन मिळणाऱ्या मेहनतानावर हे कामगार काम करीत असतात आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब या उद्योगावर अवलंबून असते. परंतु इंडस्ट्रीतील कामकाज ठप्प झाल्यामुळे या
कामगारांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. काही कलाकार आणि त्यांच्या संघटना त्यांना मदत करीत आहेत. निर्माती एकता कपूरने बालाजी टेलिफिल्ममधील कामगारांना आपला
एक वर्षांचा पगार देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. बालाजी टेलिफिल्ममध्ये विविध विभागांमध्ये काम करणारे अनेक कामगार आहेत. सध्या लाॅकडाऊनमुळे त्यांच्यावर तसेच
त्यांच्या कुटुंबीयांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे एकताने त्यांना मदतीचा हात दिला आहे. याव्यतिरिक्त अन्य काही संस्थांना तिने मदत केली आहे.
आता पुन्हा एकताने अशाच प्रकारची मदत हिंदी चित्रपटसृष्टीत नेहमीच वावरणाऱ्या फोटोग्राफर्सना केली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत काही फोटोग्राफर्स नेहमीच सेलिब्रेटींचे फोटो टिपण्यासाठी फिरत असतात. सध्या चित्रीकरणच बंद असल्यामुळे त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. अशा कठीण काळात एकताने उदारतेचा आणखी एक आदर्श घालून दिला आहे. अशा कठीण प्रसंगी
एकताने काही फोटोग्राफर्स आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सहायतेसाठी त्यांच्या बँक खात्यामध्ये काही ठराविक रक्कम जमा केली आहे. एकता कपूर सध्या लाँकडाऊनमध्ये विविध स्क्रीप्टचे
वाचन करीत आहे. तिला त्यातील एखाद दुसरी स्क्रीप्ट आवडली तर त्यावर ती चित्रपट काढणार हे निश्चित आहे. मात्र सध्याची बिकट परिस्थिती पाहता एकताने मदतीचा हात पुढे केला
आहे. फोटोग्राफर्सना तिने मदत केली आणि सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानी आणि मानव मंगलानी यांनी अन्य काही फोटोग्राफर्ससोबत एकत्र येऊन एकताला फोटोग्राफर्सना मदद
केल्याबद्दल धन्यवाद दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.