Ekta Kapoor Troll News Ekta Kapoor Troll News
मनोरंजन

Viral Video : गरिबांची वाईट पद्धतीने मदत करून फसली एकता; पद्मश्री परत घेण्याची मागणी

एकता कपूरचा व्हिडिओ मंदिराच्या बाहेरचा आहे

सकाळ डिजिटल टीम

Ekta Kapoor Troll News टीव्हीची क्वीन एकता कपूरच्या (Ekta Kapoor) अडचणीत वाढ होताना दिसत आहे. बिहारच्या बेगुसराय येथील न्यायालयाने एकता कपूर व आई शोभा कपूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केला आहे. दुसरीकडे एकता कपूरला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. ट्विटरवर एकता कपूरचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये एकता मंदिराबाहेर बसलेल्या गरीब लोकांना मदत करताना दिसत आहे. मग असे काय झाले की तिला ट्रोल केले जात आहे?

एकता कपूरचा व्हिडिओ (Viral Video) मंदिराच्या बाहेरचा आहे. ती गरिबांना फळे वाटताना दिसत आहे. मंदिराच्या बाहेर बसलेल्या लोकांना एकता फळे वाटप करीत आहे. परंतु, तिची मदत करण्याची पद्धत फारच वाईट आहे. ती दुरूनच फळ देत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. तिला कोणाचा हात लागू नये म्हणून हे केले जात आहे.

एकता कपूरने (Ekta Kapoor) एका वृद्धेला एवढ्या घाईत फळ दिले की ते पडले. गरिबांना अशी वागणूक दिल्याने नेटकरी तिला ट्रोल करीत आहे. ‘ब्रिटिशांनंतर फक्त बॉलिवूड सेलेब्स आणि उच्च दर्जाचे लोक आहेत जे गरिबांना अस्पृश्य मानतात’ असे एका युजर्सने लिहिले. अनेकांनी आपापल्या पद्धतीने राग व्यक्त केला आहे.

इच्छा नसेल तर कृपया हे करू नका

लोक प्राण्यांनाही प्रेमाने खायला घालतात, असे एका युजरने लिहिले आहे. दुसऱ्याने लिहिले की, एकताचा चेहरा पाहून हे स्पष्ट होते की ती हे करण्यात आनंदी नाही. फक्त ज्योतिषाने तिला मालिका हिट करण्याचा मार्ग सांगितला आहे. म्हणूनच हे करीत आहे. इच्छा नसेल तर कृपया हे करू नका.

हॅशटॅग ट्रेंड

व्हिडिओ बघितल्यानंतर संतप्त लोक एकता कपूरचा निषेध करीत आहे. तसेच भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार परत घेण्याची मागणी युजर्सकडून केली जात आहे. युजर्स #shame on Ekta kapoor असे हॅशटॅग ट्रेंडही करीत आहेत. तसेच #boycott bollywood ट्रेंडही सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gotya Gitte: वाल्मिक कराड माझे दैवत, धनंजय मुंडेंना बदनाम करु नका, नाहीतर... फरार गोट्या गित्तेची जितेंद्र आव्हाडांना धमकी, व्हिडिओ व्हायरल

PM Narendra Modi : जागतिक अनिश्‍चिततेत राष्ट्रहित जपणार; ‘स्वदेशी’ वापरण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

Harshwardhan Sapkal : काँग्रेसचा विचार हा पाकिस्तानचे दोन तुकडे करणारा

Rahul Mote : परंडा मतदारसंघांमध्ये पुन्हा वाजणार का? 'घड्याळाची ठकठक' घड्याळ तेच वेळ नवी!

MP Nilesh Lanke : अहिल्यानगर शहर पोलिस प्रशासनावर राजकीय दबाव; खासदार नीलेश लंके यांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT