Elvish Yadav FIR Esakal
मनोरंजन

Elvish Yadav FIR: लोकसभेचं तिकीट असंच मिळतं, एल्विशनं मनेका गांधींवर केला थेट आरोप

Vaishali Patil

Elvish Yadav FIR: बिग बॉस OTT 2 चा विजेता एल्विश यादव हा अचानक चर्चेत आला त्याचे कारण ठरले त्याच्या विरोधात केलेली FIR.

नोएडामध्ये युट्यूबर एल्विशवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोएडा पोलीस आणि वन विभागाच्या पथकाने पाच लोकांना या प्रकरणात अटक केली आहे.

त्यांच्याकडून पाच कोब्रा आणि सापाचे विष जप्त केले आहे. हे साप ती लोक एल्विशला पुरवायचे असे त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर एल्विशच्या सहकाऱ्यांवर नोएडामध्ये रेव्ह पार्टी आयोजित केल्याचा आरोपही आहे.

मनेका गांधी यांच्याकडून चालवल्या जाणार्‍या पीएफए ​​या संस्थेच्या अधिकाऱ्यांना नोएडा आणि एनसीआरमधील फार्म हाऊसमध्ये होणाऱ्या पार्टीबद्दल माहीती मिळाली होती.

यानंतर सापाचे विष घेऊन रेव्ह पार्टी केल्याप्रकरणी एल्विश यादवने व्हिडिओ शेअर करून आपली बाजू मांडली. एफआयआरनंतर एल्विशने आपल्यावरील सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.

आता एल्विशने ट्विट शेयर करत थेट मनेका गांधींवर निशाणा साधला आहे. एल्विश यादवने एक्स अकाउंटवर मनेका गांधींविरोधात ट्विट केले आहे. तो या ट्विटमध्ये लिहितो की, 'iskconवर आरोप करा..माझ्यावर आरोप करा.. अशाने लोकसभेचे तिकीट मिळणार? शेम ऑन मनेका गांधी'

सध्या एल्विशचे हे ट्विट सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्याचे चाहते त्याला पाठिंबा देत आहे तर अनेकांनी त्याच्यावर टीका केली आहे.

त्यापुर्वी सर्व आरोपाबाबत बोलताना व्हिडीओ शेअर करत एल्विश म्हणाला, "सकाळी मी उठलो, मी पाहिलं की एल्विश यादवला अटक करण्यात आली आहे, एल्विश यादव ड्रग्जसह पकडला गेला आहे, माझ्याविरोधात अशी बातमी पसरवली जात आहे.

माझ्यावर केलेले सर्व आरोप बिनबुडाचे निराधार आहेत, सर्व खोटे आहेत. यात एक टक्काही तथ्य नाही. मी यूपी पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्यासाठी तयार आहे.

मी संपूर्ण यूपी पोलिस आणि प्रशासनाला माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी यांना विनंती करेन की या प्रकरणात कुठेही सत्य आढळल्यास, मी सर्व जबाबदारी घेण्यास तयार आहे."

एल्विश यादव चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. तो यापुर्वी देखील अनेक प्रकरणामुळे चर्चेत आला आहे. मात्र आता त्याच्या अडचणीत वाढ होणार असल्याच्या चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime News : महिलेच्या नावाने इंस्टाग्राम अकाउंट काढलं अन् नको ते व्हिडिओ टाकले... मुंबईत नेमक काय घडलं?

Helicopter News : नादच पुरा केला ! कोल्हापूरच्या पठ्ठ्याने हेलिकॉप्टर विकत घेतलं, सांगलीत सासऱ्याला दाखवायला गेल्यावर जावयाचं केलं असं स्वागत...

कफ सिरपमध्ये ब्रेक ऑइलचं विषारी केमिकल, किडनी निकामी होऊन १४ मुलांचा मृत्यू; औषधावर घातली बंदी

Latest Marathi News Live Update: अमित शाह शिर्डीच्या साई मंदिरात दाखल

Kolhapur Cricket : कोल्हापुरच्या पोरी महाराष्ट्राच्या क्रिकेट संघाच करणार नेतृत्व, टी-२० च्या कर्णधारपदी अनुजा पाटील

SCROLL FOR NEXT