Elvish Yadav Abhinandan Samaroh: Esakal
मनोरंजन

Elvish Yadav Abhinandan Samaroh: सिस्टम हँग! बिग बॉस विनर एल्विश यादव करणार राजकारणात एंट्री?

अलीकडेच हरियाणातील गुरुग्रामधील देवी लाल स्टेडियममध्ये एल्विश यादवचा सत्कार समारंभ पार पडला. या कार्यक्रमात एल्विशची खरी क्रेझ दिसली. या कार्यक्रमात हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टरही दिसले.

Vaishali Patil

Big Boss OTT Winner Elvish Yadav : 'बिग बॉस OTT' चा दुसरा सिझन खुपच गाजला. हा रिअॅलिटी शो यूट्यूबर एल्विश यादवने जिंकला आहे. वाईल्ड कार्ड एन्ट्रीनंतरही एल्विशने बिग बॉस ट्रॉफी जिंकली.

एल्विश यादवची क्रेझ चाहत्यांमध्ये खुप आहे. विनर झाल्यानंतर तो सातत्याने चर्चेत आहे. नुकतच त्याने इंस्टा लाईव्हचा रेकॉर्डही तोडला. आता देखील सोशल मीडियावर त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

अलीकडेच हरियाणातील गुरुग्रामधील देवी लाल स्टेडियममध्ये एल्विश यादवचा सत्कार समारंभ पार पडला. या कार्यक्रमात एल्विशची खरी क्रेझ दिसली. या कार्यक्रमात हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टरही दिसले.

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी एल्विश यादव यांचा सत्कार समारंभात गौरव केला. यावेळी स्टेडियम लोकांच्या गर्दीने खचाखच भरलेले दिसले. या कार्यक्रमाला 3 लाखांहून जास्त लोकांची गर्दी झाली होती.

या कार्यक्रमात रोडीज फेम प्रिन्स नरुलाही एल्विशला सपोर्ट करण्यासाठी पोहोचला होता. बिग बॉसची ट्रॉफी हातात घेऊन एल्विशने त्याच्या चाहत्यांचा उत्साह वाढवला. एल्विशने स्टेजवर येताच चाहत्यांना विचारले की सिस्टम हँग झालं की नाही... हे ऐकताच चाहत्यांनी जोरदार जल्लोष सुरू केला.

या सत्कार समारंभात तरुणांना संबोधित करताना मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी आयुष्यात नेहमी ड्रग्जपासून दूर राहण्याचे आवाहन केले.

याच कार्यक्रमात त्यांनी 1 नोव्हेंबर रोजी हरियाणा दिनानिमित्त हरियाणा सरकार राज्यस्तरीय टॅलेंट हंट कार्यक्रमाचे आयोजन करणार असून तेथील तरुणांचा सन्मान करणार असल्याचं सांगितलं.

यापूर्वीही एल्विशने हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली होती. आता या कार्यक्रमातही त्याचा सत्कार करण्यात आला. त्याची क्रेझ आणि चाहत्यांची संख्या पाहता आता एल्विश हा राजकारणात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

त्यानंतर एल्विशने यावर प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, “मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना भेटणे ही एक विशेष अनुभूती होती. त्यांनी माझ्या कामाचं कौतुक केलयं. माझ्या भविष्याबाबत मी अजून काहीही ठरवलेले नाही. हरियाणाचे मुख्यमंत्री हे आशीर्वाद देण्यासाठी मला भेटले आहेत,”. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT