Vaibhavi Upadhyay, jay gandhi, Vaibhavi Upadhyay fiancee, Vaibhavi Upadhyay news SAKAL
मनोरंजन

Vaibhavi Upadhyay Fiance: 'मला तु हवी आहेस..', वैभवीच्या मृत्यूनंतर प्रियकराची अवस्था वाईट

वैभवीच्या जाण्याने तिचा होणार नवरा जय गांधीने सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्यात.

Devendra Jadhav

Vaibhavi Upadhyay Fiance Emotional Post: टीव्ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचं काही दिवसांपूर्वी निधन झालं.

साराभाई वर्सेस साराभाई मध्ये जॅस्मिनची भूमिका करणाऱ्या वैभवी उपाध्यायच्या जाण्यानं चाहत्यांना शोक अनावर झाला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये एका कार अपघातात वैभवीचा मृत्यू झाला आहे.

अवघ्या ३२ व्या वर्षी वैभवीनं जगाचा निरोप घेतल्यानं तिच्या चाहत्यांमध्ये मोठा शोक पसरला. वैभवीच्या जाण्याने तिचा होणार नवरा जय गांधीने सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्यात.

जयने सोशल मीडियावर त्याचा आणि वैभवीचा फोटो पोस्ट केलाय. हा फोटो पोस्ट करून जयने इमोशनल पोस्ट लिहिली आहे.

जय लिहितो.. आपण परत भेटेपर्यंत….तुझ्या त्या खास आठवणी नेहमी माझ्या चेहऱ्यावर आनंद देत राहतील.. जर मी तुला थोडावेळ माझ्या आयुष्यात परत मिळवू शकलो असतो, तर आपण नेहमीप्रमाणे बसून बोलू शकू.

जय पुढे लिहितो.. "तुमचा कायम माझ्यासाठी स्पेशल राहशील आणि पुढेही असशील. तू आता इथे नाहीस ही वस्तुस्थिती मला नेहमीच वेदना देत राहील, परंतु आपली पुन्हा भेटत नाही तोपर्यंत तू कायम माझ्या हृदयात आहेस…. R I P माझे प्रेम.." अशी पोस्ट जय गांधीने केलीय.

दरम्यान वैभवीने निधनाआधी शेवटचा व्हिडीओ पोस्ट केला होता.. (tv actress) वैभवीने या व्हिडिओमध्ये एक कॅप्शन दिले होतं. ज्यावर असे लिहिले आहे की, 'सगळं काही बाजूला ठेवून थोडं थांबा आणि मोकळा श्वास घ्या.. कारण आयुष्यातला प्रत्येक क्षण आपण जगून घ्यायला हवा..'

हे कॅप्शन वाचून अनेकांना धक्काच बसला होता. तीची ही पोस्ट मृत्युच्या आधी १६ दिवसांपूर्वीची आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आता वाऱ्यासारखा व्हायरल झाला.

याच हिमाचल प्रदेशच्या प्रवासादरम्यान तिच्या कारचा अपघात झाला आणि वैभवीचे निधन झाले. मुंबईत अभिनेत्रीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. वैभवीच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: ‘राष्ट्रवादी’च्या राज्य नेतृत्वामध्ये बदलाची शिफारस; प्रशांत किशोर यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी रणनीतीबाबत चर्चा

Maharashtra Teacher Recruitment : राज्यात 30 हजार, तर कोल्हापुरात 606 शिक्षकांची महाभरती; 'पवित्र पोर्टल'वर पसंतीक्रम नोंदणीला सुरुवात, झेडपी शाळांमध्ये सर्वाधिक 13,351 जागा

IND vs SL: टीम इंडिया ९ वर्षांनी श्रीलंकेत खेळणार कसोटी! कोणाच्या नावावर सर्वाधिक विकेट्स अन् धावा?

Marathi News Live Updates : राष्ट्रवादीसाठी आगामी रणनीती ठरवण्याच्या कामाला प्रशांत किशोर यांच्याकडून सुरुवात

Nagpur Ganeshotsav 2026: गणेशोत्सव मंडळांच्या परवानगीसाठी ‘सिंगल विंडो’ ; महापौर नीता ठाकरे;ऑनलाइन मिळणार सर्व ना हरकत प्रमाणपत्रे

SCROLL FOR NEXT