Hema Malini Reaction About Esha-Bharat Divorce esakal
मनोरंजन

Hema Malini : हेमाजींनी घेतली लेकीची बाजू, म्हणून तर अजूनपर्यत...! ईशा-भरतच्या घटस्फोटावर काय म्हणाल्या?

ईशा अन् भरतच्या घटस्फोटावर (Esha Divorce Hema Malini Reaction) हेमा मालिनींची प्रतिक्रिया का समोर आली नाही?

युगंधर ताजणे

Hema Malini Reaction About Esha-Bharat Divorce : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांची लेक ईशा देओलच्या घटस्फोटानंतर (Esha And Bharat Divorce News) वेगवेगळ्या चर्चांना उधाण आल्याचे दिसून आले आहे. प्रसिद्ध उद्योगपती भरत तख्तानीसोबत ईशानं परस्पर संमतीनं घटस्फोट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या अकरा वर्षांच्या सहजीवनानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

या सगळ्या प्रकरणात हेमा मालिनी यांची कोणतीही प्रतिक्रिया समोर (Hema Malini Latest News) आली नसल्यानं पुन्हा चर्चेला सुरुवात झाली. खरं तर सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ आणि फोटोसाठी चर्चेत असणाऱ्या हेमाजींचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यांच्या लाडक्या लेकीच्या घटस्फोटाच्या बातमीवर त्यांची कोणतीही प्रतिक्रिया न आल्यानं नेटकऱ्यांनी त्यावरुन वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले आहे. इंडियन एक्सप्रेसनं देखील त्यावर एक वृत्त दिले आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईशा आणि भरतच्या घटस्फोटानं त्या (Latest Entertainment News) कुटूंबातील कुणाला फार मोठा धक्का बसलेला नाही. असे सांगण्यात येत आहे. याचा अर्थ फार पूर्वीपासूनच हेमा मालिनी यांना देखील लेकीच्या घटस्फोटाविषयी माहिती होती अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या घटनेवर अद्याप हेमा मालिनी यांची प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

हेमा मालिनी यांच्या ७५व्या जन्मदिनी ज्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये भरत तख्तानी दिसला नव्हता. तेव्हापासून त्याविषयी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हेमा मालिनी यांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता. यावेळी बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते.

एवढेच नाही तर ईशाच्या जन्मदिनी देखील, आयोजित करण्यात आलेल्या पार्टीमध्ये भरत सहभागी झाला नव्हता. त्यामुळे ईशा आणि भरतमधील दुराव्याविषयी चर्चा सुरु झाली होती. झूमच्या एका रिपोर्टनुसार, बऱ्याच दिवसांपासून ईशा आणि भरत हे वेगळे होणार याविषयी चर्चा सुरु होती. फक्त त्यांनी ती गोष्ट जाहीर करण्यासाठी योग्य वेळ हवी होती. असेही त्यामध्ये म्हटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आधी मतदार, नंतर नागरिक! सोनिया गांधींबद्दल भाजपचा खळबळजनक दावा

दक्षिण कोरियाच्या माजी 'फर्स्ट लेडी'ला अटक, पतीही तुरुंगात; १० बाय १० च्या कोठडीत होणार रवानगी

Maharashtra Politics: पालिका निवडणुका पक्ष म्हणूनच लढवणार, भाजप नेत्याचं वक्तव्य चर्चेत

Operation Sarbkaf: नवं ऑपरेशन! ५५ हजार लोकांनी घर सोडलं, अनेक भागात ७२ तास संचारबंदी, पाकिस्तानी सैन्याचा नेमका प्लॅन काय?

AIIMS Doctors: 'एम्स'च्या ४२९ डॉक्टरांचे राजीनामे; प्रतिष्ठित संस्थेतून बाहेर पडण्याचं सत्र, धक्कादायक कारणं

SCROLL FOR NEXT