Esha Deol on Dharmendra's kissing scene in 'Rocky Aur Rani...' Esakal
मनोरंजन

Esha Deol : 'माझे पप्पा तर....' धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या 'किसिंग सीन'वर ईशा देओलची भन्नाट प्रतिक्रिया

रणवीर -आलियाच्या किसिंग सीनपेक्षा धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या किसिंग सीननं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

युगंधर ताजणे

Esha Deol on Dharmendra's kissing scene in 'Rocky Aur Rani Kii Prem Kahaani' : प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आल्याचे दिसून आले होते. त्यात प्रख्यात अभिनेते धर्मेंद्र आणि अभिनेत्री शबाना आझमी यांच्या किसिंग सीननं खळबळ उडाली होती.

भलेही करण जोहरच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली असली तरी त्यातील रणवीर -आलियाच्या किसिंग सीनपेक्षा धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या किसिंग सीननं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यावर आतापर्यत वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी प्रतिक्रियाही दिल्या होत्या. त्यात धर्मेंद्र यांच्या पत्नी प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याही नावाचा समावेश आहे.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

हेमा मालिनी यांनी देखील आपण उद्या अशाप्रकारे किसिंग सीन देण्यास घाबरणार नाही. असे म्हटले होते. कथेची गरज असेल आणि दिग्दर्शकानं आपल्याकडे कथेसाठी अशा प्रकारे सीन देण्याची विनंती केल्यास आपण त्याचा विचार करु अशी प्रतिक्रिया हेमा मालिनी यांनी दिली होती. दुसरीकडे शबाना आझमी यांनी देखील या प्रकरणावर दिलेल्या प्रतिक्रियेनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

आता धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओलची प्रतिक्रिया समोर आली आहे. इंडिया टुडेनं दिलेल्या एका वृत्तानुसार ईशानं दिलेल्या प्रतिक्रियेची चर्चा होत आहे. ईशानं आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले आहे की, किसिंग सीनसाठी वय हा काही वादाचा किंवा चर्चेचा मुद्दा होऊ शकत नाही. ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात घ्यायला हवी. दुसरी गोष्ट म्हणजे माझे वडील हे खूपच स्मार्ट आहेत. त्यांची गोष्टच वेगळी आहे. ते रोमँटिक देखील आहेत. त्यांची शायरी आणि त्यांचा अंदाज याची नेहमीच चर्चा होत असते. अशा शब्दांत ईशानं प्रतिक्रिया दिली आहे.

रणवीर आणि आलियाच्या रॉकी और रानी की प्रेम कहानीनं प्रेक्षकांची तुफान पसंती मिळवली. बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर करण जोहरनं या चित्रपटाच्या माध्यमातून कमबॅक केले आहे. त्याची मोठ्या प्रमाणात चर्चाही होत आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर दोनशे कोटींपेक्षा अधिक कमाई केल्याचे दिसून आले आहे. रणवीर आणि आलियाच्या अभिनयाचे कौतुक होत आहे.

मात्र यासगळ्यात चर्चा झाली ती धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या किसिंग सीनची. त्यामध्ये चाहत्यांनी या दोन्ही सेलिब्रेटींचे कौतुक केले आहे. तर काही नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी हेमा मालिनी, शबाना आझमी यांच्याही प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT