parag kanhere 
मनोरंजन

BBM 3: 'त्यांची १६ तासांची मेहनत वाया घालवू नका'; पराग कान्हेरे स्पर्धकांवर संतप्त

"हे स्पर्धक निकाल न देता टास्क वाया का घालवत आहेत?"

स्वाती वेमूल

"हे स्पर्धक निकाल न देता टास्क वाया का घालवत आहेत?"

Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठी सिझन ३ हा चांगलाच रंगला आहे. अगदी पहिल्या दिवसापासून या शोने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. तसेच घरात पार पडलेल्या टास्कची, त्यादरम्यान झालेल्या भांडणांची याची चर्चा सोशल मीडियावर होत असते. या आठवड्यात देखील घरातील कॅप्टनची निवड होऊ शकली नाही. यावर आता बिग बॉस मराठीचा माजी स्पर्धक पराग कान्हेरेने Parag Kanhere फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. बिग बॉसच्या घरातील प्रत्येक स्पर्धकाविषयी त्याने मोकळेपणाने मत मांडलं आहे.

पराग कान्हेरेची पोस्ट-

'बिग बॉसची प्रॉडक्शन टीम हा शो अधिक लोकप्रिय करण्यासाठी बराच प्रयत्न करत आहे. मला माहित आहे की ते ब्रेकशिवाय सुमारे १६ तास काम करतात. पण हे स्पर्धक निकाल न देता टास्क वाया का घालवत आहेत? त्यामुळे त्यांची सर्व मेहनत वाया जात आहे. सोनाली हुशारीने खेळत आहे. विशाल विनाकारण तिच्याशी उद्धट वागू लागला आहे, तो स्वतःच्याच हितचिंतकांचे ऐकत नाही. सहानुभूती कार्ड प्रत्येकवेळी खेळलं जातं. ग्लॅमर ग्रुप आक्रमकपणे खेळत आहे, पण विशाल, विकास, मीनल आणि सोनालीने नीतीमत्तेसह खेळ खेळावा. कारण ते महाराष्ट्राचे आवडते स्पर्धक आहेत. विशालला कालच टास्क सहज जिंकता आला असता, कारण तृप्ती ताई त्यांच्या बाजूने होत्या. तो योग्य नियोजन करून टास्क खेळू शकला असता. सोबतच मीनल आणि सोनालीला विशालच्या बॅचेसचे संरक्षण करण्याची संधी मिळायला हवी होती. त्यामुळे निश्चितच टास्कचा निकाल चांगला मिळाला असता आणि विशाल कॅप्टन झाला असता,' अशी पोस्ट परागने लिहिली आहे.

'मला माहिती आहे माझ्या या विधानांसाठी मला ट्रोल केले जाईल. पण विशाल हा माझा आवडता स्पर्धक असूनही, मला त्याच्या चुकांवर टीका करण्याचे स्वातंत्र्य आहे. कारण तुमच्या सर्वांप्रमाणेच मी देखील प्रेक्षक म्हणून बिग बॉस मराठी पाहत आहे. ते पाहण्यासाठी मी माझा मौल्यवान वेळ घालवतो. या सर्वांमध्ये मी सेलिब्रिटी नाही. प्रत्येकाला माझ्या मतांचा आणि पोस्टचा विरोध करण्याचा अधिकार आहे. मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो आणि नेहमीच करीन,' असंही त्याने पुढे स्पष्ट केलं.

बिग बॉस मराठी ३ च्या या आठवड्यामध्ये सुरेखा कुडची यांना घरामधून बाहेर जावे लागले. महेश मांजरेकर यांनी सुरेखाताईंना दिलेल्या विशेष अधिकारानुसार त्यांनी तृप्ती देसाई यांना कॅप्टन बनवलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT