Ashok Samarth Instagram
मनोरंजन

'मराठी इंडस्ट्रीत मला...', सिंघम फेम अशोक समर्थ स्पष्टच बोलले

सकाळ पॉडकास्ट मुलाखतीत अभिनेते अशोक समर्थ यांनी मराठी इंडस्ट्रीविषयी अनेक थेट वक्तव्य केली आहेत.

प्रणाली मोरे

Ashok Samarth: केवळ मराठी इंडस्ट्री नाही तर टॉलीवूड,बॉलीवूड आणि भोजपूरीतही आपल्या अभिनयानं आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे सिंघम फेम अशोक समर्थ तब्बल ८ ते ९ वर्षांच्या ब्रेकनंतर पुन्हा मराठी मालिकांकडे वळले आहेत. 'तू तेव्हा तशी' मालिकेत सध्या ते खलनायकी पात्र आकाश जोशी रंगवताना दिसत आहेत. सकाळ पॉडकास्ट मुलाखतीत अशोक समर्थ यांनी मराठी इंडस्ट्रीविषयीची मनात असलेली खंत बोलून दाखवली आहे. त्याचवेळी त्यांनी आपलं बारामती कनेक्शन सांगताना अजित दादा पवार आणि शरदजी पवार यांच्याविषयीच्या काही आठवणी देखील शेअर केल्या आहेत.(Exclusive: Singham Fame Ashok Samarth, Tu tenvha Tashi Actor podcast Interview)

'सिंघम फेम अशोक समर्थ यांनी मराठी इंडस्ट्रीवर साधला निशाणा, ते स्पष्टच बोलले ...' ,अशोक समर्थ यांच्या पॉडकास्ट मुलाखतची लिंक इथे जोडलेली आहे. मुलाखत नक्की ऐका.

सकाळ पॉडकास्ट मुलाखतीत अशोक समर्थ यांनी आपला अभिनय प्रवास,तो करतानाचा स्ट्रगल मांडताना अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. अशोक समर्थ बारामतीकर. पवार कुटुंबाशी त्यांचे जवळचे संबंध नसले तरी त्या कुटुंबाविषयी त्यांच्या मनात असलेला जिव्हाळा त्यांच्या बोलण्यातून नक्कीच दिसून आला. स्ट्रगल करत असताना मुंबईत फुटपाथवर राहण्याची वेळ आली होती पण तेव्हा अजित दादा पवारांमुळे अशोक समर्थांना छप्पर वाट्याला आलं याचा अनुभव त्यांनी शेअर केला आहे. याच मुलाखतीत 'सिंघम' नंतर शरद पवार यांचा सहवास मिळाला तेव्हा त्यांना जवळून जाणून घेण्याची संधी मिळाली हे सांगताना समर्थ मोठं विधान करुन गेले. ते म्हणाले, 'शरद पवार कोणाला कळलेच नाहीत अजून कारण...',आता समर्थ नेमके काय म्हणालेत हे ऐकण्यासाठी बातमीत पॉडकास्ट मुलाखतीची लिंक जोडलेली आहे ती नक्की ऐका.

अशोक समर्थ जवळ-जवळ ८ ते ९ वर्षांच्या ब्रेकनंतर 'तू तेव्हा तशी' या झी मराठी वरच्या मालिकेतून मराठी इंडस्ट्रीत परतले आहेत. गेली काही वर्ष ते बिझी आहेत बॉलीवूड,टॉलीवूड आणि भोजपूरी सिनेमांमध्ये. आपण मराठीकडे पाठ फिरवण्याचं कारण म्हणजे इथे आपल्या रमू दिलं नाही याविषयी सांगताना अशोक समर्थ यांनी काही थेट वक्तव्य करत मराठी इंडस्ट्रीवर निशाणा साधला आहे. आता नेमका तो निशाणा कोणावर साधलाय आणि ती थेट तिखट वक्तव्य समर्थांनी कोणाविरोधात केली आहेत,कोणती केली आहे त हे सगळं जाणून घेण्यासाठी अशोक समर्थ यांची ही बातमीत जोडलेली पॉडकास्ट मुलाखत नक्की ऐका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी कपात, २०० रुपयांनी झाले स्वस्त

Tamhini Ghat: ताम्हिणी घाट अद्याप वाहतुकीसाठी बंद; नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

India Monsoon Forecast : विदर्भ-मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी! बंगालच्या उपसागरातील घडामोडींमुळे जुलै तर तरला, पण पुढील 2 महिने कसा राहील मॉन्सून? पाहा काय सांगतो IMD रिपोर्ट

India Medal Tally in CWG 2026: 'Gen Z' ची हवा! ज्युदोत ३ ऐतिहासिक पदकं अन् नीरजचे रौप्य... तालिकेत भारत कितव्या क्रमांकावर?

PM Narendra Modi: "माझ्या आईचाही अपमान झाला... पण मी तुम्हाला माफ करतो"; जंतर मंतर प्रकरणावर PM मोदींचा भावनिक इन्स्टा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT