Facts about hritik roshans personal life 
मनोरंजन

हृतिकचं खरं नाव काय आहे ? कोणाचा होता तो दिवाना ? घ्या जाणून !

वृत्तसंस्था

मुंबई : बॉलिवूडमधला हॉट अभिनेता हृतिक रोशनचा आज 46वा वाढदिवस! 'कहो ना प्यार है' या पहिल्याच चित्रपटातून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेला हृतिक निवडक पण उत्तम कथानक असलेल्या भूमिका करण्यासाठ फेमस आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही त्याने बरेच चढ-उतार पाहिलेत. मधल्या काळात पत्नी सुझान-हृतिक या जोडप्याचा घटस्फोट झाला, त्यानंतर त्याच्या आयुष्यात अनेक बदल घडले. हृतिकचं खरं नाव काय आहे हे तुम्हाला माहित आहे का? त्याच्याविषयी अशाच काही काही रंजक गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

काय आहे हृतिकचं खरं नाव ?
हृतिकचं खरं नाव 'ऋतिक राकेश नागरथ' असं आहे. राकेश त्याच्या वडिलाचं तर, नागराथ त्याच्या आजोबांचं नाव आहे. आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे हृतिकच्या घराचं नाव ! हृतिकच्या घराचं नाव 'डुग्गू' असं आहे. तर, त्याच्या वडिलांच्या म्हणजेच राकेश यांच्या घराचं नाव 'गुड्डू' आहे. 

हृतिकचे वडिल राकेश हे सुद्धा अभिनेते दिग्दर्शक आहेत. त्यामुळे हृतिक लहानपणापासूनच अभिनयाच्या संपर्कात राहिला. बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणजेच मधूबाला. लाखो चाहते असणाऱ्या अभिनेत्रीचा दिवाना होता हृतिक. परवीन बॉबी यांचाही तो खूप मोठा चाहता आहे. अभिनय क्षेत्रातील आणखी एक दिग्गज कलाकार म्हणजे धमेंद्र. त्यांच्या अभिनयाचा हृतिक चाहता आहे. 

वडिलही याच क्षेत्रात असल्याने हृतिक लहानपणापासूनच त्या वातारणात वाढला. साहजिकच अभिनय क्षेत्राकडे त्याची अधिक ओढ होती. लहानपणापासूनच त्याने अभिनयास सुरुवात केली. आशा, भगवान दादा, आपके दीवाने अशा हिंदी चित्रपटांमधून त्याने बालकलाकार म्हणून काम केलं आहे.

काही मजेशीर गोष्टी त्याच्या कामाविषयी
हृतिकचा पहिला चित्रपट आठवतो का ? आजही त्याची लव्हस्टोरी चाहत्यांना आवडते, तो म्हणजे 'कहो ना प्यार है'. त्याच्या या पहिल्या चित्रपटाची ऑफर किंगखान शाहरुख खानला आली होती. पण, शाहरुखला कथा फारसी आवडली नाही. त्यामुळे हृतिकला हा चित्रपट मिळाला. या चित्रपटातील गाणी आजही चाहत्यांची तितकिच आवडती आहेत. 

'अशी' आहे त्याची पर्सनल लाइफ
हृतिकला काही वर्षांपूर्वी स्मोकिंग म्हणजेच धुम्रपानाचं व्यसन होतं. त्याने "हाऊ टु स्टॉप स्मोकिंग'' हे पुस्तक वाचलं आणि धुम्रपान कायमचं सोडलं. बॉलिवूडमध्ये नेहमीच नवनवीन कलाकारांची एन्ट्री होत असते. असं असलं तरी आधीच्या कलाकारांची फॅनफोलोइंग कमी होत नाही. हृतिकला दोन मुलं आहेत आणि तरीही तो आजही तितकाच फिट आणि हॅंडसम अभिनेता आहे. त्यामुळे सलग दोनदा तो आशियातला सर्वात सेक्सी पुरुष ठरला आहे. एका वर्षी 'वॅलेंटाइन डे' ला हृतिकला चक्क 30 हजार मुलींनी प्रपोज केले होते. 

हृतिकची लव्हलाइफ नेहमीच चर्चेत राहिली आहे. सुझन त्याची बायको आहे. त्यांचा घटस्फोट झाला असला तरी आजही दोघांचं एकमेकांवर प्रेम कायम आहे. मध्यंतरी हृतिक कंगणा रणावतला डेट करत होता. मागिचं वर्ष म्हणजेच 2019 हृतिकसाठी लकी ठरलं. त्याचे दोन चित्रपट बॉक्सऑफिसवर सुपरहिट ठरले. 'सुपर 30' आणि 'वॉर' हे दोन चित्रपट सुपरहिट झाले. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'शेतापर्यंत आता हक्काचा रस्ता; गावनिहाय शिवारफेरी, रस्त्याला संकेतांक मिळणार; वादावादी मिटणार

CET 2025 : आता केंद्रांपर्यंत जाणे हीच ‘परीक्षा’, सारथी, बार्टी, महाज्योतीचा भोंगळ कारभार; विद्यार्थ्यांना फटका

Nagpur Crime: अकरा वर्षीय मुलाची अपहरण करून हत्या; खापरखेडा जवळील चनकापूर हादरले, तिघांना अटक

Latest Maharashtra News Updates : कुख्यात गुंड छोटा राजनचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

SCROLL FOR NEXT