aggabai sasubai 
मनोरंजन

शुभ्रानंतर आता बबड्यासुद्धा बदलणार; 'हा' प्रसिद्ध अभिनेता साकारणार सोहमची भूमिका

स्वाती वेमूल

अत्यंत वेगळं कथानक घेऊन 'अग्गंबाई सासूबाई' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. अल्पावधीतच या मालिकेने व त्यातील कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. मालिकेतील बबड्या हे पात्र कितीही नकारात्मक असलं तरी त्याची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता आशुतोष पत्कीला चांगली ओळख मिळाली. आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून एका नव्या रुपात व नव्या कथानकासह प्रसारित होणार आहे. 'अग्गंबाई सासूबाई' हे नाव बदलून आता 'अग्गंबाई सूनबाई' या नावाने मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यातील काही कलाकारसुद्धा बदलल्याचं पाहायला मिळतंय. 

या नव्या मालिकेचा प्रोमो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. त्यामध्ये आसावरीची भूमिका साकारणाऱ्या निवेदिता सराफ व अभिजीत यांची भूमिका साकारणारे गिरीश ओक मालिकेत तसेच आहेत. मात्र आसावरीच्या भूमिकेत बरेच बदल करण्यात आले आहे. नेहमी घाबरून राहणारी आसावरी आता चक्क व्यावसायिका झाली आहे. तर दुसरीकडे त्यांची सून शुभ्राच्या भूमिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधानऐवजी उमा पेंढारकर दिसली. शुभ्राची भूमिका बदलल्याने बबड्याचीसुद्धा बदलणार का, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. तर बबड्याचीही भूमिका बदलली असून आता अभिनेता अद्वैत दादरकर ही भूमिका साकारणार आहे. 

अद्वैतने 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत सौमित्रची भूमिका साकारली होती. एकीकडे ही मालिका संपत असताना अद्वैत मात्र 'अग्गंबाई सूनबाई'मधून पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अद्वैतने साकारलेल्या सौमित्रच्या भूमिकेलाही प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळालं. 'अग्गंबाई सूनबाई' ही नवीन मालिका आता सूनबाईच्या दृष्टीकोनातून असल्याने त्यात काय नवीन बदल होतील आणि ते प्रेक्षकांना आवडेल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Betting : ऑनलाइन बेटिंगमुळे कर्ज झाल्याने संपविले जीवन; प्रथमेशच्या लेटर नोटमधील माहिती

Palghar News : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला आणि अटक वॉरंटची मागणी

Marathi News Live Updates : हडपसरमधील माळवाडीत आठ घरे आगीत भस्मसात; एका घरात सिलेंडरचा स्फोट

Shirur Maratha reservation protest: शिरूरमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा; मराठा आरक्षणासाठी पुणे–नगर मार्गावर रास्ता रोको

Takli Rajeray Crime : टाकळी राजेराय पोलिसांची धडक कार्यवाही; दोनशे किलो गोमांस जप्त

SCROLL FOR NEXT