David Dhawan Hospitalized  Google
मनोरंजन

प्रसिद्ध दिग्दर्शक डेव्हिड धवन यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

वडील डेव्हिड धवन यांची तब्येत बिघडल्याचं कळताच मुंबईत सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी असलेला वरुण धवनही रुग्णालयाच्या दिशेनं तातडीनं रवाना झाला .

प्रणाली मोरे

बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक डेव्हिड धवन(David Dhawan) यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डेव्हिड धवन यांचा मुलगा अभिनेता वरुण धवन गेल्या काही दिवसांपासून त्याच्या 'जुग जुग जियो' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. वरुण धवनला(varun Dhawan) या प्रमोशन दरम्यानच वडिलांची तब्येत बिघडल्याचं कळलं तेव्हा तो तातडीनं कार्यक्रम सोडून रुग्णालयात(Hospital) जाण्यासाठी रवाना झाला.(David Dhawan Hospitalized)

डेव्हिड धवन यांना मधूमेहाचा त्रास आहे,तोही जास्त प्रमाणात. त्यामुळेच त्यांची तब्येत बिघडली अन् त्यांनारुग्णालयात दाखल केलं गेलं. अद्याप त्यांच्या प्रकृती संदर्भात सविस्तर माहिती समोर आलेली नाही. नेमका त्यांना काय त्रास सुरू झालाय आणि रुग्णालयात दाखल करण्याची गरज का भासली याविषयी देखील काही कळालेलं नाही.

वरुण धवन सध्या 'जुग जुग जियो' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. १५ जून २०२२ रोजी मुंबईत एका प्रमोशनल कार्यक्रमात तो बिझी होता तेव्हाच त्याच्या फोनवर वडील डेव्हिड धवन यांना रुग्णालयात दाखल केलं गेल्याची बातमी कळाली. आणि हे ऐकताच तो रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाला.

७० वर्षांचे डेव्हिड धवन यांचे नाव बॉलीवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकांमध्ये घेतलं जातं. त्यांनी 'कुली नं १', 'मैं तेरा हिरो','जुडवा','हसीना मान जाएगी','साजन चले ससुराल','जोडी नं १' सारखे अनेक सुपरहिट सिनेमे त्यांच्या नावावर आहेत. वरुण धवन आणि रोहित धवन ही त्यांच्या मुलांची नावं आहेत. आणि दोघेही इंडस्ट्रीत चांगलं नाव कमावत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP vs Shivsena: २०२९ तयारी? भाजपमधील इनकमींगची दूसरी बाजू काय? शिंदे गटाच्या नेत्यांविरुद्ध ‘स्ट्राँग प्लॅन-B’ तयार?

Mundhwa Land Scam : शीतल तेजवानी, अमेडिया कंपनीला समन्स; खारगे समितीपुढे सुनावणी, व्यवहाराची इत्थंभुत माहिती घेणार

Rising Star Asia Cup 2025 : भारत 'अ' संघाचा ओमान 'अ' संघावर ६ गडी राखून दणदणीत विजय, सेमिफानलचं तिकीट केलं पक्क...

Latest Marathi Breaking News Live Update : मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा संताप उसळला: मदत वाटपातील विषमतेविरोधात वैजापूरमध्ये उपोषण

Ajit Pawar : मिळकतकराचा तिढा दोन दिवसांत सुटणार; समाविष्ट गावांचे प्रश्न तातडीने सोडवण्याचे अजित पवार यांचे आदेश

SCROLL FOR NEXT