kiara advani  Sakal
मनोरंजन

Sidharth Kiara Wedding: 'ही' प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट कियारा अडवाणीला देणार 'ब्रायडल लूक'

कियाराला नववधूचा लूक कोण देणार हे जाणून घेण्याचीही सर्वांना उत्सुकता आहे. म्हणजेच तिचा मेकअप आर्टिस्ट कोण असेल.

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडचे लोकप्रिय कपल सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी जैसलमेरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांचे लग्नाआधीचे फंक्शन्स सुरू झाले आहेत. अशात सर्वांच्या नजरा शेरशाह जोडीच्या लग्नाच्या अपडेट्सवर खिळल्या आहेत. त्याचवेळी, या सगळ्यामध्ये, कियाराला नववधूचा लूक कोण देणार हे जाणून घेण्याचीही सर्वांना उत्सुकता आहे. म्हणजेच तिचा मेकअप आर्टिस्ट कोण असेल.

मेकअप आर्टिस्ट स्वर्णलेखा गुप्ता कियाराला ब्राइडल लुक देईल. शनिवारी संध्याकाळी गुप्ता इतर मेकअप आर्टिस्टसह जैसलमेरला रवाना झाली होती. कियाराची आई आणि तिच्या कुटुंबातील इतर सदस्यांसाठी मेकअप आर्टिस्टची आणखी एक टीम जैसलमेरला पोहोचली आहे. कियाराचा हेअरस्टायलिस्ट अमित ठाकूरही त्याच्या टीमसोबत जैसलमेरला पोहोचला आहे.

स्वर्णलेखा गुप्ता हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध नाव आहे. तिने चित्रपटांमध्ये कियाराचा मेकअपही केला आहे. कबीर सिंग या सुपर-डुपर हिट चित्रपटातील कियाराचा 'नो मेकअप' लूक स्वर्णलेखाने केला होता. यासोबतच तिने अनेक टीव्ही जाहिराती आणि चित्रपटांमध्ये कियाराला आपला लूक दिला आहे.

स्वर्णलेखाने माधुरी दीक्षित, करीना कपूर खान, करिश्मा कपूर, ब्रुना अब्दुल्ला, आलिया भट्ट, परिणीती चोप्रा, आदिती राव हैदरी यांसारख्या अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसोबतही काम केले आहे.

दुसरीकडे, कियारा अडवाणी शनिवारी दुपारी जैसलमेर विमानतळावर दिसली. यादरम्यान, अभिनेत्रीने पांढरा आऊटफिट परिधान केला होता आणि गुलाबी शाल देखील घेतली होती. डिझायनर मनीष मल्होत्राही कियारासोबत स्पॉट झाला होता.

तर सिद्धार्थ मल्होत्रा ​​मुंबईहून ब्लॅक कलरच्या आऊटफिटमध्ये जैसलमेर विमानतळावर दिसला. लग्नासाठी जैसलमेरला पोहोचलेल्या सिद्धार्थसोबत त्याचे कुटुंबीयही होते. या जोडप्याचे ७ फेब्रुवारीला लग्न होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोशी दुर्घटना! ६० तासानंतरही ८ जणांचा शोध नाही, नातेवाईकांचा आक्रोश; मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा, आयुक्तांनी काय सांगितलं?

उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह १५ अधिकारी निलंबित; महसूल विभागात गैरप्रकार, मंत्री बावनकुळेंची माहिती

Kaygaon News : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मुख्याध्यापकांनीच उचलला तणनाशकाचा पंप; विद्यार्थी सुरक्षा आणि आरोग्याच्या काळजीसाठी पुढाकार

Mohol News : मोहोळ येथे पंचायत समिती प्रशासन व नगरपरिषद प्रशासनात मोठा संघर्ष, नवीन नगरपरिषद इमारत बांधकामाचा पेटला वाद

Ayodhya Ram Mandir: राम मंदिर चोरीप्रकरण! काँग्रेसला अटल बिहारी वाजपेयींची आठवण; जुन्या भाषणाचा दिला दाखला

SCROLL FOR NEXT