South Films Singer Sangeetha Sajith esakal
मनोरंजन

दक्षिण सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायिका संगीता साजिथ यांचं निधन

सकाळ डिजिटल टीम

गायिका संगीता साजिथ यांचं आज तिरुवनंतपुरम इथं निधन झालंय.

मल्याळम, तमिळ, तेलुगु आणि कन्नड भाषांमध्ये 200 हून अधिक चित्रपट गाणी गायलेल्या गायिका संगीता साजिथ (South Films Singer Sangeetha Sajith) यांचं रविवारी, 22 मे रोजी तिरुवनंतपुरम इथं निधन झालं. त्या 46 वर्षांच्या होत्या. संगीता या किडनीशी संबंधित आजारानं त्रस्त होत्या. केरळच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गजांनी त्यांच्या आकस्मिक निधनावर शोक व्यक्त केलाय.

संगीता या मूळच्या केरळच्या असून त्यांनी एसए चंद्रशेखर यांच्या 1992 मध्ये आलेल्या 'नालैया थेरपू' या चित्रपटातून तमिळ (Tamil) पार्श्वगायनात पदार्पण केलं. प्रभू देवाच्या 'मिस्टर रोमियो' चित्रपटासाठी उस्ताद ए. आर. रहमान यांनी संगीतबद्ध केलेलं त्यांचं 'थन्नेराई कधालिकुम' हे गाणं 1990 च्या मध्यात खूप लोकप्रिय झालं होतं. 1998 चा मल्याळम चित्रपट 'एन्नू स्वांथम जानकीकुट्टी'साठी कैथापराम दामोदरन नंबूथिरीद्वारे संगीतबद्ध केलेल्या 'अम्बिली पूवत्तम पोन्नरुली' सारख्या अनेक मधुर मल्याळम गाण्यांना त्यांनी आपला आवाज दिला आहे.

2007 चा रक्कीपट्टू चित्रपट, मोहनलालच्या अभिनीत कक्काकुयिलसाठी (2001) 'आलारे गोविंदा' आणि ममूट्टीच्या पझहस्सी राजासाठी (2009) 'ओदथंडिल थलम कोट्टम' आदी गाण्यांना त्यांनी आपला आवाज दिला होता. गेल्या वर्षी त्यांनी पृथ्वीराज सुकुमारन स्टारर 'कुरुथी'चं थीम सॉन्ग गायलं होतं, जे जॅक बिजॉय यांनी संगीतबद्ध केलं होतं. 2020 मध्ये दिग्दर्शक सचीच्या अय्यप्पनम कोशियुमसाठी संगीता यांनी 'थलम पोयी' हे गाणंही गायलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hanumant Pawar Threat Allegation : हनुमंत पवारांकडून धमक्या व शिवीगाळ; हिंदुत्ववादी तुषार दामगुडे यांचा आरोप, “संविधानाच्या चौकटीत लढणार”

India vs Pakistan सामना १४ जूनला! ICC च्या निर्णयाने सर्वांना झटका; १२ संघांचा समावेश असलेल्या मोठ्या स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक

Dombivli News: प्रवाशाची झडती, रिक्षात धारधार शस्त्रे अन्...; डोंबिवलीत संशयास्पद ऑटो चालक ताब्यात, काय घडलं?

Latest Marathi News Live Update : तळोज्यात १ कोटींच्या अमली पदार्थांवर पोलिसांची कारवाई; दोघे जेरबंद

IND vs AUS: स्मृती मानधनाला हरमनप्रीत ऐवजी अचानक का करावं लागलं टीम इंडियाचं नेतृत्व? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT