Aamir Khan, Shah rukh Khan Google
मनोरंजन

आमिरच्या 'लाल सिंग चड्ढा' ला शाहरुखचा टोमणा

अनेक दिवसांनंतर शाहरुख खाननं ट्वीटरवर कमबॅक करत पोस्ट केली अन् हा प्रसंग घडला.

प्रणाली मोरे

शाहरुख खाननं(Shah rukh Khan) बऱ्याच दिवसांनी ट्वीटर(Twitter)च्या माध्यमातून सोशल मीडियावर पुन्हा कमबॅक केलं अन् चाहत्यांनी त्याच्यावर नुसता प्रश्नांचा भडिमार केला. शाहरुखने चाहत्यांसाठी खास एक लाईव्ह सेशन घेतलं होतं,'Ask Me Anything?' या टायटल अंतर्गत. त्यावेळीच त्यानं आपल्या 'पठाण' सिनेमाचा टीझर लॉंच केला. त्याने तब्बल दहा मिनिटं या लाईव्ह चॅट अंतर्गत चाहत्यांशी संवाद साधला. हा एक प्रकारे 'पठाण' सिनेमाच्या प्रमोशनचाच भाग होता म्हणा. याच सेशनमध्ये शाहरुखला आमिर(Aamir Khan) वरनं एका चाहत्यानं प्रश्न विचारला आणि त्यावर शाहरुखनं आपली नाराजगी न दाखवत त्याला मजेशीर उत्तर दिलं. काय होता चाहत्याचा तो प्रश्न? आणि काय दिलं होतं शाहरुखने त्यावर उत्तर?

चाहत्यानं पठाणच्या टीझर रिलीजच्या प्रसंगी शाहरुखला विचारलं,' तू आमिरचा लाल सिंग चड्ढा सिनेमा पाहिलास का?' त्यावर शाहरुख प्रसंगावधान राखून म्हणाला,''अरे यार,आमिर केहता है पेहले पठाण दिखा!'' आता शाहरुखचं हे उत्तर आहे की नाही मजेशीर. म्हणजे शाहरुख-आमिर मध्ये जे शीतयुद्ध आहे त्याचा कुठलाही मागमुस इथे किंग खानने लागू दिला नाही.

आमिरचा 'लाल सिंग चड्ढा'(Lal Singh Chaddha) ११ ऑगस्ट रोजी सर्वत्र सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा १९९४ मधील अमेरिकन सिनेमा 'फॉरेस्ट गम्प'चा रीमके असल्याचं बोललं जात आहे. आमिर व्यतिरिक्त 'लाल सिगं चड्ढा' मध्ये करिना कपूर,नागा चैतन्य,मोना सिंग हे देखील मुख्य भूमिकेत आहे. तर शाहरुखचा 'पठाण' हा २५ जानेवारी रोजी म्हणजे पुढील वर्षी प्रदर्शित केला जाणार आहे. २०१८ नंतर शाहरुखचा प्रदर्शित होणारा हा पहिलाच सिनेमा आहे. 'पठाण'(Pathan) मध्ये शाहरुखसोबत दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आहे. 'पठाण'चा टीझर रीलीज करताना शाहरुखनं चाहत्यांसाठी खास पोस्टही लिहिली आहे. तो म्हणालाय,''मला माहित आहे थोडा उशीर झाला आहे सिनेमा प्रदर्शनासाठी. पण प्रदर्शनाची तारीख विसरू नका. पठाण येतोय तुमच्या भेटीला''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी खिलाडूवृत्ती दाखवली असती! Run Out वर सलमान अली आघाची प्रतिक्रिया; सचिनला बाद केले तेव्हा विसरलेले sportsmanship

FASTag Annual Pass वार्षिक टोल पास झाला महाग, १ एप्रिलपासून नवे दर लागू

Nashik LPG Supply : नाशिककरानो घाबरू नका! जिल्ह्यात पुरेसा गॅस साठा; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

Nutritionist Health Tips: तुम्हाला 35 वर्षानंतरही राहायचंय फिट आणि निरोगी? न्यूट्रिशनिस्टच्या ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा

Iran Israel War मुळे भारतात दारूचा दुष्काळ? उन्हाळ्यात थंड बिअरही मिळणार नाही? उत्पादनावर काय परिणाम होणार

SCROLL FOR NEXT