Fan beaten by Nana Patekar breaks silence, see what he said  SAKAL
मनोरंजन

Nana Patekar: मी तर अंघोळ करुन फक्त... नाना पाटेकरांकडून मार खाल्लेल्या चाहत्याने सोडलं मौन, काय म्हणाला बघा

नाना पाटेकरांनी सेल्फी घ्यायला आलेल्या ज्या चाहत्याला मारलं त्याने मौन सोडलंय

Devendra Jadhav

Nana Patekar Video: नाना पाटेकर यांनी काही दिवसांपुर्वी एका फॅनला मारलं. वाराणसीमध्ये जर्नी सिनेमाचं शुटींग करताना सेल्फी घ्यायला आलेल्या एका फॅनला नाना पाटेकरांनी जोरात चापट मारली. हा व्हिडीओ नंतर चांगलाच व्हायरल झाला.

नाना पाटेकरांना लोकांच्या नाराजीला सामोरं जावं लागलं. नाना पाटेकरांनी या सर्व प्रकरणात माफी मागीतली. अशातच नाना पाटेकरांनी ज्या फॅनला मारलं त्याने सोशल मीडियावर त्याच्या भावना व्यक्त केल्यात. काय म्हणाला फॅन बघा.

नाना पाटेकर यांनी सेल्फी घ्यायला आलेल्या चाहत्याला जोरात चापट मारली. तो फॅन एका मीडिया चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, "घाटावर चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे की नाही किंवा कोणी सेलिब्रिटी तेथे आहे की नाही याची मला कल्पना नव्हती. मी नेहमीप्रमाणे नुकताच घाटावर अंघोळीसाठी गेलो होतो. जेव्हा मला समजले की, जवळच नाना पाटेकर यांच्या एका चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. त्यानंतर मी नाना पाटेकर यांच्याकडे गेलो. एका बाऊन्सरने मला थांबवण्याचा प्रयत्न केला पण मी कसाबसा त्यांच्याजवळ गेलो."

मी सेल्फी घ्यायला जाणार तोच नानांनी मला चापट मारली आणि मला बाऊन्सरने बाहेर काढलं. माझ्या विभागात सर्वांना ही घटना समजली असल्याने माझी इज्जत गेलीय. याशिवाय नाना पाटेकर यांनी मारल्यावर मला परत बोलावलं, ते सर्व खोटं आहे. असं काही घडलंच नाही.

नानांवर पोलीस कारवाई करणार का? असा प्रश्न विचारताच फॅनने नकार दिला. अशाप्रकारे या सर्व प्रकारानंतर फॅनने त्याच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या

नाना पाटेकर यांचा माफीनामा

नाना पाटेकर यांनी या झाल्या प्रकाराबद्दल व्हिडीओ बनवत माफी मागितली. नाना म्हणाले, 'मला माहित नव्हते की तो कोण होता? मला वाटले की तो आमच्या क्रूपैकी एक आहे, म्हणून मी त्याला रिहर्सलनुसार त्याला मारलं आणि त्याला निघून जाण्यास सांगितले. नंतर मला कळले की तो क्रूचा भाग नव्हता, म्हणून मी त्याला परत बोलावले, पण तो पळून गेला. हा व्हिडिओ त्याच्या मित्राने शूट केला असण्याची शक्यता आहे.

नाना पाटेकर म्हणाले, 'मी कधीही कोणाला फोटो काढण्यास नकार दिला नाही. मी असे कधीच केले नसते...जे काही झाले ते चुकून झाले. काही गैरसमजांमुळे हे घडले. मला क्षमा करा. मी पुन्हा असं कधीच करणार नाही'.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Gaming: PokerBaazi कंपनीचा शेअर कोसळला, 2 दिवसांत 20 टक्के घसरण; गुंतवणूकदारांचे 2,000 कोटी रुपये बुडाले

Viral Video: इंस्टा जाम, गुलाबी साडीत किन्नरचं सौंदर्य... सोशल मीडियावर धुमाकूळ, चक्क ६.२५ कोटी लोक झाले फिदा!

रोहितनंतर सूर्यकुमार यादवचीही विकेट पडणार? गौतम गंभीर 'लाडक्या'ला कर्णधार करणार

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

Video : तुम्हीपण असा डबा वापरता काय? बाबांनो, जेवणाचं होईल विष, धक्कादायक व्हिडिओ पाहा

SCROLL FOR NEXT