Shilpa Shetty, Ranveer Singh Google
मनोरंजन

शिल्पा शेट्टी नाही ही तर 'लेडी रणवीर सिंग'...

फॅन्सनी केलं अभिनेत्रीचं नवीन नामकरण....काय आहे यामागचं कारण जाणून घ्या.

प्रणाली मोरे

शिल्पा शेट्टी(Shilpa Shetty) नेहमीच तिच्या परफेक्ट स्टाईलसाठी ओळखली जाते तर दुसरीकडे रणवीर सिंग मात्र मिस-मॅच अतरंगी स्टाईलचा आयकॉन म्हणून ओळखला जातो. शिल्पाला अनेकदा तिच्या कपड्यांवरनं खूप चांगल्या कमेंट्स मिळतात आणि दुसरीकडे रणवीरला तर फॅन्स विचारतातही, 'चुकून दिपिकाचा स्कर्ट घालून घाई-घाईत तर निघाला नाहीस ना'. म्हणजे मागे एका कार्यक्रमात त्याने स्कर्टसारखाच एक ड्रेस घातला होता आणि त्याला ट्रोलर्सनी हैराण करून सोडलं होतं. पण आपला हट्ट सोडेल तो रणवीर कुठला. त्यानं काही असले विचित्र फॅशनचे कपडे घालणं सोडलं नाही. पण आता त्याच्या ड्रेसिंग सेन्सची हवा 'फॅशन दिवा' म्हणून ओळखल्या जाणा-या शिल्पा शेट्टीला लागली आहे की काय अशी चर्चा होऊ लागली आहे.

Shilpa Shetty

तर त्याचं झालं असं की शिल्पा शेट्टी ही काल रात्री सौदी अरेबियातील 'रीयाध' येथे होणा-या 'दबंग' टूरसाठी रवाना झाली आहे. ज्याचा सर्वेसर्वा आहे सलमान खान. तेव्हा सलमान खान,आयुष शर्मा,प्रभुदेवा ही मंडळीही रियाधसाठी रवाना झाली आहेत. शिल्पा या टूरसाठी जाताना कलिना एअरपोर्टवर स्पॉट केली गेली. तेव्हा सगळ्यांचं लक्ष खिळून राहिलं ते तिच्या चेह-यावर नाही बरं का तर तिने पायात घातलेल्या शूजवर. तिनं दोन पायात दोन वेगवेगळ्या प्रकारचे शूज घातले होते. आता ही कुठली नवी फॅशन म्हणून शिल्पाकडे पाहून उपस्थितांनी तोंडात बोटंच घातली म्हणायची ना.

शिल्पाने काळ्या रंगाचं लेदर जॅकेट घातलं होतं. आणि पांढ-या रंगाचा टॉप व जीन्स असा एकंदरीत तिचा पेहराव होता. नेहमीप्रमाणेच प्रवास करताना खूप कूल लूकमध्ये दिसणारी शिल्पा यावेळी मात्र तिच्या शूजमुळे ट्रोलर्सच्या कमेंट्सचा निशाणा ठरलीय. काहींनी तिला 'लेडी रणवीर सिंग' म्हणून संबोधलंय तर काहींनी चक्क म्हटलंय की,'कोणत्या मंदिराच्या बाहेरून चोरले शूज?' आता यातला विनोदाचा भाग सोडला तर शिल्पाला रणवीरचं वारं लागलं म्हणायला हरकत नाही. शिल्पा सध्या 'इंडियाज गॉट टॅलेंट'च्या जज पॅनेलवर आहे. तिच्यासोबत किरण खेर व बादशहाही जज म्हणून काम पाहत आहेत. ती सेटवरचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करीत असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

सुलतानला नऊ वर्षं पूर्ण ! सलमानने सिनेमासाठी स्वतःमध्ये घडवलेले हे पाच बदल

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

SCROLL FOR NEXT