Athiya Shetty, K.L.Rahul Google
मनोरंजन

'भाऊ नाही मेहुणा आहे तुझा तो';फॅन्सनी काढली के.एल.राहूलची विकेट

अभिनेता अहान शेट्टीची बहिण अथिया शेट्टीसोबत आहे रीलेशनशीपमध्ये

प्रणाली मोरे

बॉलीवूडकर आणि क्रिकेटर्स यांची अफेअर्स जास्त गाजली. मग अगदी अमृता सिंगपासून ते आताच्या अनुष्का शर्मा पर्यंत बघायला गेलं तर कितीतरी नावं घेता येतील. आता आपल्या बॉलीवूड अण्णाची म्हणजे अभिनेता सुनिल शेट्टीची लेक अथिया शेट्टीही(Athiya Shetty) क्रिकेटर के.एल.राहूलच्या(K.L.Rahul) प्रेमात पडलीय. आपलं रीलेशन सर्वांसमोर स्विकारण्याआधी या दोघांनी सोशल मीडियावरील शेअर केलेल्या फोटोतून यांच्यात काहीतरी शिजतंय असा अंदाज सर्वांनीच लावला होता. सगळयांनी विचारून-विचारून हैराण केल्यावर अखेर अथिया आणि के.एल.राहूलने आपल्यातलं नातं सोशल मीडियावर स्विकारलं एकदाचं. पण एकत्र कुठे समोर आले नव्हते. पण नुकत्याच अहान शेट्टीच्या 'तडप' या सिनेमाच्या स्क्रीनिंगच्या निमित्तानं दोघे पहिल्यांदाच एकत्र मीडियासमोर आले. पण यानंतर या दोघांची चर्चा रंगण्यापेक्षा,के.एल.राहूलने अहान सोबत शेअर केलेल्या फोटोला दिलेल्या कॅप्शनवरनं सोशल मीडियावर हशा पिकलाय. काय आहे नेमकं ते कॅप्शन आणि कुठला फोटो आहे तो?No more looking back my brother @ahan.shetty .
So proud ❤️ only bigger things ahead for you 🧿🤗Tadap out now ⭐️

त्याचं झालं असं की,के.एल.राहूलने त्याच्या इन्स्टाग्रामवर अहान शेट्टी सोबतचा एक फोटो शेअर केलाय. ज्यात ते दोघे मागे वळून पहातायत. त्यावर के.एल.राहूलने लिहिलंय,''No more looking back my brother @ahan.shetty .So proud ❤️ only bigger things ahead for you 🧿🤗Tadap out now ⭐️''. हे कॅप्शन देतानe के.एल ने अहानला 'भाऊ' म्हणून संबोधलंय. त्यावर एका फॅन्सने के.एल ची टांग खिचाई केलीय. तो के.एल.राहूलला म्हणाला,'अरे भाऊ नाही ,मेहुणा आहे तुझा'. तुला नात्यांची नावं कळत नाहीत का?' यानंतर अनेकांनी के.एलच्या या पोस्टवर स्माईली इमोजी देत कमेंट्स केल्या आहेत.

अथियानं बॉलीवूडमध्ये एन्ट्री तर केली पण दोन-तीन सिनेमाच्या पुढे काही तिची गाडी गेली नाही. सध्या सुनिल शेट्टीची मुलगी इतपत तिची ओळख आहे. अर्थात आता तिला क्रिकेटर के.एल.राहूलची गर्लफ्रेंड म्हणूनही नवीन ओळख मिळालेली आहे. त्यामुळे पदरात फिल्म पडत नसली तरी के.एल.राहूलसोबतच्या नात्यानंतर ग्लॅमरचं वलय मात्र तिच्याभोवती नक्की आहे. जून मध्ये इंग्लंडमधील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या निमित्तानं अथियाला के.एल.सोबत क्रिकेटर्सची फॅमिली म्हणून प्रवेश मिळाला होता. के.एल.राहूल ने तिची नोंद आपली पार्टनर म्हणून केली होती हे जेव्हा कळले तेव्हाच यांच्यातील नात्याचा खुलासा झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

Latest Maharashtra News Updates : ..मग महाराष्ट्रात भाषे वरून भांडणे का लावली जात आहेत? - संजय राऊतांचा सवाल!

Farmer Situation : औसा तालुक्यातील शिवणी (बु.) येथील वृद्ध शेतकरी दांपत्य ओढताहेत हाताने कोळपे

टीआरपीमध्ये अचानक वर आली 'ही' मालिका; 'या' मालिकांना टाकलं मागे; अभिनेत्याने केली खास पोस्ट

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

SCROLL FOR NEXT