मनोरंजन

घरच्यांसोबत 'बालिका वधू' पाहण्याची लाज वाटते, फॅन्सची प्रतिक्रिया

टीव्ही मनोरंजन क्षेत्रात tv entertainment काही मालिकांनी लोकप्रियतेच्या बाबत उच्चांक गाठले आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - टीव्ही मनोरंजन क्षेत्रात tv entertainment काही मालिकांनी लोकप्रियतेच्या बाबत उच्चांक गाठले आहे. बालिका वधू balika vadhu ही मालिका ही त्यापैकी एक म्हणता येईल. या मालिकेची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते. आताही या मालिकेला चाहत्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेचा नवा प्रोमो व्हायरल झाला होता तेव्हा त्यावरुन चाहत्यांनी या मालिकेच्या निर्माते आणि दिग्दर्शक यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. आताही ट्रोलर्सनं आपल्याला या मालिकेच्या रटाळपणानं वैताग आला आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. त्याची चर्चा जोरदार सुरु आहे.

अविका गौर avika gaur अभिनेत्री या मालिकेत प्रमुख भूमिका साकारते. तिच्या फॅन्सनं एकदा तिला जे सांगितलं त्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होताना दिसते आहे. 2008 पासून बालिका वधू ही मालिका प्रसारित होत आहे. त्याचा मोठा चाहतावर्गही आहे. देशात सर्वाधिक लोकप्रिय मालिकांच्या यादीत या मालिकेचाही समावेश आहे. वेगवेगळ्या प्रकारे चाहते या मालिकेशी जोडले गेले आहेत. असे असताना एका फॅन्सनं तिला या मालिकेवरुन एक प्रतिक्रिया दिली होती. त्याचं म्हणणं होतं की, ही मालिका आता आम्हाला कुटूंबासमवेत पाहताना लाजल्यासारखं होतं. त्यावरुन वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे.

अविका या मालिकेशी 2008 पासून जोडली गेली आहे. या मालिकेनं तिला मोठ्या प्रमाणावर ग्लॅमर मिळाले. प्रसिद्धीच्या झोतात आली. सगळीकडे तिच्या नावाची चर्चाही आहे. सोशल मीडियावरही तिला मोठ्या संख्येनं फ़ॉलोअर्स मिळाले. मात्र दुसरीकडे या मालिकेचा रटाळपणा आता प्रेक्षकांना सहन होत नसल्याचे त्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून समोर आले आहे. त्यामुळे अविका आणि तिची बालिका वधू ही मालिका चर्चेत आली आहे. बालविवाह सारख्या सामाजिक प्रश्नावर ही मालिका आधारलेली आहे. अजूनही ती मालिका वेगळ्या स्वरुपात प्रेक्षकांसमोर येते. तेव्हा त्यातील अनेक बाबी त्यांना खटकत असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या आहेत.

राजस्थानातील एका ग्रामीण भागात घडणारं बालिका वधूचं ते कथानक मालिकेच्या माध्यमातून जगभर पोहचलं. 2008 ते 2016 या कालावधीत ही मालिका प्रसारित झाली. इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार अविकानं सांगितलं, मी जेव्हा 2010 मध्ये दिल्लीत होते. तेव्हा तिथे मला एक चाहता भेटला. आणि त्यानं मला माझ्या बालिका वधू या मालिकेविषयी त्याची प्रतिक्रिया दिली. ती व्यक्ती 60 च्या घरातील होती. त्या व्यक्तीनं सांगितलं होतं, मुली मला माफ कर, मात्र तुझा तो कार्यक्रम मला माझ्या परिवारासमवेत पाहता येत नाही. आम्हाला तो कार्यक्रम पाहताना लाज वाटते. मी त्यांना का असं विचारले तेव्हा ते म्हणाले, तुझ्या मालिकेत जे दाखवले जाते तोच प्रकार माझ्या परिवारात होत असल्यानं मी ते पाहणे टाळतो. अशी त्यांचे म्हणणे होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बनावट FIF, CBI नोटीस आणि Supreme Court ची कागदपत्रे... ज्येष्ठ नागरिकाची १.४७ कोटींची सायबर फसवणूक कशी झाली?

Latest Live Updates Marathi: पाच कोटींच्या खंडणीसाठी गुत्तेदाराचे अपहरण; मुख्य अभियंत्याच्या चालकासह चौघे जेरबंद

Privacy Risk : धक्कादायक खुलासा! मोबाईल, लॅपटॉप काही सेकंदांनी घेतोय सिक्रेट स्क्रीनशॉट; सुरक्षा धोक्यात, लगेच बंद करा 'ही' सेटिंग

तिन्ही फॉरमॅटमध्ये सलामीवीर कोण? वैभव सूर्यवंशी नाही तर दुसराच खेळाडू रोहितचा उत्तराधिकारी, सेहवागने सांगितलं नाव

अरे जा आता गप्प... T20 मुंबई लीगमध्ये राडा, बॉलरने मग काढला वचपा... VIDEO

SCROLL FOR NEXT