Samantha  Sakal
मनोरंजन

Samantha: सामंथाचा हॉस्पिटलमधला फोटो पाहून चाहते चिंतेत, जाणून घ्या काय आहे सत्य

सामंथाचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये अभिनेत्रीची प्रकृती पाहून चाहते चिंता व्यक्त करत आहेत.

Aishwarya Musale

सध्या साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री सामंथा चर्चेत आहे. अलीकडेच, सामंथाचा नुकताच प्रदर्शित झालेला 'शाकुंतलम' चित्रपट पाहिल्यानंतर, दक्षिणेतील एका प्रसिद्ध निर्मात्याने अभिनेत्रीबद्दल जाहीरपणे सांगितले की, आता सामंथाला पूर्वीसारखे ग्लॅमर राहिलेले नाही. समंथाने तिचे स्टारडम गमावले आहे. या चर्चेदरम्यान आता समंथाने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये ती पुन्हा हॉस्पिटलमध्ये दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी सामंथाचा 'शाकुंतलम' चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. दरम्यान, समांथाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत ज्यात तिच्या गेल्या दिवसांची अनेक झलक पाहायला मिळतात. या फोटोंमध्ये तिचे हॉस्पिटलमध्ये जाण्यापासून ते, प्रवास करतानाचे आणि काम करतानाचे फोटोही आहेत.

मात्र, समंथाच्या एका फोटोने काही लोक हैराण झाले आहेत. खरं तर सामंथाचा हॉस्पिटलचा फोटो पाहून लोक अस्वस्थ झाले आहेत. समंथाला पुन्हा काय झाले या विचाराने लोकांना चिंता वाटू लागली आहे. पण आम्ही तुम्हाला सांगतो की घाबरण्यासारखे काही नाही.

कारण अभिनेत्रीचा तो फोटो थेरपी दरम्यानचा आहे. ऑटोइम्यूनसाठी ‘हायपरबेरिक थेरपी’ दरम्यान त्यांनी तो फोटो काढला. सामंथाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर जुन्या आठवणींना उजाळा देत अनेक फोटो शेअर केले आहेत. तिने कॅप्शनमध्ये, ‘जसा माझा दृष्टिकोन आहे…’ असं लिहिलं आहे.

समंथाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘शकुंतलम’ सिनेमाच्या पराभवानंतर ती आगामी वेब सीरिज ‘सिटाडेल’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. राज आणि डीके या सीरिजचे दिग्दर्शन करणार आहेत. या सीरिजमध्ये सामंथा आणि वरुण धवन पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT